Solapur News esakal
महाराष्ट्र बातम्या

Solapur News: ‘पोषण’चा तांदूळ संपल्याने चिमुकली उपाशी! 48 दिवसांसाठीच मिळणार पोषण आहार

ऐन उन्हाळ्यात शाळांमधील तांदूळ संपल्याने सद्यःस्थितीत एकाही शाळेत पोषण आहार शिजत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

तात्या लांडगे

Solapur News: जिल्ह्यातील चार हजार ८५ शाळांमधील पावणेपाच लाख विद्यार्थी शालेय पोषण आहाराचा लाभ घेतात. मात्र, ऐन उन्हाळ्यात शाळांमधील तांदूळ संपल्याने सद्यःस्थितीत जिल्ह्यातील एकाही शाळेत पोषण आहार शिजत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याने ही परिस्थिती ओढवली असून आता दोन दिवसांत तांदूळ पोच करण्याची धडपड सुरु आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पोषण आहाराची व्यवस्था सांभाळण्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक स्वतंत्र अधिकारी मंजूर आहे. मात्र, सध्या वैभव राऊत यांच्या खांद्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असून १० पदे रिक्त आहेत.

दुसरीकडे फेब्रुवारीत पूर्वीच्या निविदेची मुदत संपली आणि नवीन निविदा काढावी लागली. आता पुढील ४८ दिवसांची निविदा काढण्यात आली असून साधारणत: ३० एप्रिलपर्यंत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणार आहे.

सध्या जिल्ह्यातील कोणत्याच शाळांमध्ये पोषण आहाराचा तांदूळ शिल्लक राहिलेला नाही. जुनी पेन्शन योजनेचा संप, शाळा बंद आणि अनेक विद्यार्थी गैरहजर राहिले. त्यामुळे त्याची झळ जाणवली नाही.

आता संप मिटल्याने शाळा पूर्ववत होणार असल्याने विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार द्यावा लागणार आहे. दरम्यान, १ मेनंतर शाळांना उन्हाळा सुटी लागणार आहे. १२ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत.

उन्हाळा सुटीत चिमुकल्यांना शालेय पोषण आहार मिळणार की नाही याचा निर्णय निश्चित झालेला नाही. दरम्यान, आता आगामी ४८ दिवसांत विद्यार्थ्यांना पोषण आहारातून तूरडाळ व भात, मूगडाळ व भात आणि मटकी डाळ व भात असे मेनू दिले जाणार आहे.

(उन्हाळा सुटीत पोषण आहार बंद) : सोलापूर शहर-ग्रामीणमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जवळपास अडीच लाख विद्यार्थी आहेत. त्यातील हजारो विद्यार्थी हातावरील पोट असलेल्या कुटुंबातील आहेत.

अनेकजण शाळांमध्ये पोषण आहार मिळत असल्याने शाळांमध्ये टिकून आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, उन्हाळा सुटीत त्यांना या ‘शालेय पोषण आहार’ योजनेचा लाभ मिळणार नाही.

त्यामुळे त्यांना बालमजुरीच करावी लागेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे उन्हाळा सुटीच्या ४१ दिवसांत देखील गरजूंना पोषण आहार द्यावा, अशी मागणी वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT