Lok Sabha election esakal
महाराष्ट्र बातम्या

Lok Sabha 2024: काँग्रेसला सलग दोन वेळा अपयश आलं, ही जागा 'राष्ट्रवादी'ने लढवावी; पवारांसमोर पदाधिकाऱ्यांची मागणी

विदर्भात चार जागांवर राष्ट्रवादीची ताकद

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यातील २१ लोकसभा मतदार संघात ताकद असल्याचा दावा काँग्रेसने केल्यानंतर विदर्भातील चार लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची इतर पक्षापेक्षा अधिकची ताकद असल्याचा दावा या मतदारसंघातील स्थानिक नेत्यांनी केला आहे.

‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विदर्भातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी गडचिरोली, रामटेक, वर्धा आणि अमरावती हे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:कडे घ्यावेत अशी आग्रही भूमिका स्थानिक नेत्यांनी मांडल्याचे समजते.

अमरावती लोकसभेत नवनीत राणा या खासदार असल्या तरी त्यांना ‘राष्ट्रवादी’ने पुरस्कृत केले होते. त्यामुळे अमरावती लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचीच आहे.

पक्षाने पुरस्कृत केलेला उमेदवार या मतदारसंघात विजयी झाला असल्याने अमरावती लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळायला हवा, अशी आग्रही भूमिका स्थानिक नेत्यांनी शरद पवार यांच्यासमोर मांडली. ही माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

ज्या लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे, त्या मतदारसंघाचा आढावा पक्ष घेत असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

काँग्रेसकडून रामटेक घ्या

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला सलग दोन वेळा अपयश आले. त्यामुळे ही जागा ‘राष्ट्रवादी’ने लढवावी अशी मागणी पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. वर्धा आणि गडचिरोली या लोकसभा मतरदारसंघात पक्षाला संधी मिळावी, अशी आग्रही भूमिका या बैठकीत मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Weather Update: विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यभर हवामानाचा बदलता अंदाज, ११ जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Chuda Matar Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट अन् हेल्दी मेन्यू! कमी वेळात बनणाऱ्या 'बनारसी पोह्या'ची पाहा सोपी रेसिपी

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT