soybean seed Rate 
महाराष्ट्र बातम्या

Agri Market Rates: सोयाबीन बियाण्यांचे दर घसरणार! कपाशीचे दर वाढले, तुरीत किंचित दरवाढ

कृष्णा लोखंडे -सकाळ वृत्तसेवा

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात कपाशीच्या बियाण्यांचे दर वधारले असले तरी सोयाबीनचे दर कमी राहण्याचा अंदाज आहे. तुरीच्या दरातही किंचित वाढ संभव असल्याचे विक्रेत्यांनी म्हटले आहे. एक जूननंतर बियाणे विक्रीस सुरवात होणार आहे.

सोयाबीन व कपाशी ही खरीप हंगामातील मुख्य पिके असून तूर, मूग, उडीद, सूर्यफूल यांची आंतरपेरणी केल्या जाते. पुढील महिन्यात खरीप हंगामास सुरुवात होणार असून सध्या मशागतीने वेग घेतला आहे. (Latest Marathi News)

शेतकऱ्यांचीही बियाणे व खतांच्या नियोजनाची लगबग सुरू झाली आहे. बियाणे बाजारात कपाशीच्या बियाण्यांचे दर जाहीर झाले असले तरी सोयाबीन व तुरीसह इतर पिकांचे दर अद्याप जाहीर झालेले नाहीत.

सर्वाधिक पेरा असणाऱ्या सोयाबीन बियाण्यांचे दर महाबीज निश्चित करीत असून त्यांनी जाहीर केलेल्या दरांवर इतर निर्मात्या कंपन्यांचे दर अवलंबून आहेत. संकरित (रिसर्च व्हेरायटी) बियाण्यांचे दर महाबीजपेक्षा ३ ते १० रुपये अधिक राहतात.

त्यांची एक बॅग २५ किलोची तर महाबीजची ३० किलोची आहे. सोयाबीन हे कमोडीटी ट्रेडिंग प्रॉडक्ट असल्याने हंगामात सोयाबीनचे दर कसे होते, यावर त्यांच्या बियाण्यांचे दर निश्चित केले जातात. (Marathi Tajya Batmya)

गतवर्षीच्या हंगामात सोयाबीनच्या बाजारात प्रति क्विंटल ८ ते ९ हजारांवर दर होते. त्यावेळी सोयाबीन बियाणे १०० ते ११० रुपये प्रति किलो होती. रिसर्च व्हरायटीचे दर १० रुपयांनी अधिक होते, असे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशातूनही बियाणे विक्रीसाठी येत असून त्यांचे दर राज्यातील दरांच्या तुलनेत तीन ते पाच रुपये कमी राहतात, अशीही माहिती त्यांनी दिली.

यावर्षीच्या हंगामात खुल्या बाजारात सोयाबीनला पाच ते साडेपाच हजार रुपये दर मिळाला. सध्या हा दर पाच हजारांच्या आसपासच आहे. याच किमतीच्या आधारे यंदा बाजार दर ठरणार आहेत. यावेळी सोयाबीनचे दर १०० रुपयांपेक्षा कमी व ८५ रुपयांच्या आसपास राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे.

कपाशीचे दर ४३ रुपयांनी वाढले

अमरावती विभागात सोयाबीनचा पेरा तुलनेने अधिक राहतो. विभागात १४.७६ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीन तर, कापूस ११.०१ लाख हेक्टर व तूर ४.३७ हेक्टर क्षेत्रात राहण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

त्यासाठी बियाण्याचे नियोजन करण्यात आले असून कपाशीसाठी ५५.०९ लाख पाकिटे, सोयाबीनसाठी ३.७४ लाख क्विंटल बियाणे लागणार आहे.

कपाशीचे दर जाहीर झाले असून प्रति पाकीट ८५३ रुपये दर आहे. गतवर्षीच्या तुलनेत ते ४३ रुपयांनी अधिक आहे. तुरीच्या बियाण्यांच्या किमतीतही वाढीचे संकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT