Devendra-Fadnavis-Chandrakant-Patil sakal solapur
महाराष्ट्र बातम्या

सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रस्ताव सरकार दरबारी धुळखात! अधिकारी म्हणाले, २९३ कोटींचा निधी मिळाल्यावरच सुरवात शक्य

कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यांपूर्वी सोलापूर शहरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे, अशी सोलापूरकरांची मागणी आहे. त्या दोन्ही जिल्ह्यांत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले, पण सोलापूरकरांच्या नशिबी अजूनही प्रतीक्षाच आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यांपूर्वी सोलापूर शहरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे, अशी सोलापूरकरांची मागणी आहे. त्या दोन्ही जिल्ह्यांत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले, पण सोलापूरकरांच्या नशिबी अजूनही प्रतीक्षाच आहे. तंत्रशिक्षण विभागाच्या उपसंचालकांकडून संचालकांकडे गेलेला प्रस्ताव आता शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्या ठिकाणी प्रस्तावावर कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

सोलापूर शहरातील तंत्रनिकेतनच्या जागेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हावे, जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यातून अभियांत्रिकीचे मोफत शिक्षण घेता येईल, हा त्यामागील हेतू आहे. त्यासाठी पुरेशा प्रमाणात जागा देखील आहे. तंत्रनिकेतनच्या तत्कालीन प्राचार्यांनी तसा प्रस्ताव उपसंचालकांना पाठविला असून, शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी उच्चशिक्षण मिळेल, असा उद्देश होता.

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यासंदर्भात निवेदन दिले. त्यानंतर तंत्रशिक्षण विभागाच्या उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून प्रस्ताव मागवून घेण्यात आला. तो प्रस्ताव संचालकांकडून शासनाला सादर झाला. आता सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी जवळपास २९३ कोटी रुपये लागणार आहेत. तो निधी मिळाल्याशिवाय कॉलेज सुरू होणे अशक्य असल्याचेही त्या वरिष्ठ सूत्रांनी म्हटले आहे.

...तर ‘एआयसीटीई’कडून मान्यता अशक्य

एखाद्या जिल्ह्यात शासकीय किंवा खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी संबंधित संस्थेची स्वत:ची किंवा भाडेकरारावरील पुरेशी जागा, वर्कशॉप, विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था (इमारती), प्रयोगशाळा अशी व्यवस्था लागते. त्यानंतर मान्यतेचा प्रस्ताव अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) पाठविला जातो. त्यांच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करून निकषांच्या आधारे मान्यता दिली जाते. मात्र, सोलापूर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी स्वत:ची जागा आहे, पण इमारती नसल्याने त्या उभारल्याशिवाय मान्यता शक्य नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कोल्हापूरला ‘या’मुळे कॉलेज लवकर सुरू

कोल्हापुरात शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याची मागणी शासनाने पूर्ण केली. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातीलच कॉलेज असल्याने ‘एआयसीटीई’कडूनही लगेच मान्यता मिळाली. कारण, त्या ठिकाणी पूर्वीची इमारत होती, मोठे वर्कशॉप होते, जागा उपलब्ध होती, असे नाव न छापण्याच्या अटीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पण, सोलापुरात केवळ रिकामी जागा असून, तेथे इमारती बांधाव्या लागतील, मगच कॉलेजसाठी मान्यता मिळू शकेल, असेही अधिकारी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT