Election Commission to announce ZP elections

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

झेडपी निवडणुकांचा बिगुल ‘या’ दिवशी वाजणार! 2 टप्प्यात की एकाच टप्प्यात निवडणूक? सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष; झेडपीसाठी ‘ईव्हीएम’ देखील कमीच

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपूर्वी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणे अपेक्षित होत्या. मात्र, ११ जानेवारीनंतरही जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे आता २१ दिवसांत १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक मुदतीत होणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपूर्वी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणे अपेक्षित होत्या. मात्र, ११ जानेवारीनंतरही जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे आता २१ दिवसांत १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक मुदतीत होणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या २० जिल्हा परिषदांसह उर्वरित पंचायत समित्यांसंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यानंतर आयोग निवडणुकीचे नियोजन जाहीर करेल, असे सूत्रांनी सांगितले.

सोलापूरसह १२ जिल्हा परिषदांनी ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण काढले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात या जिल्हा परिषदांची निवडणूक होईल, अशी आशा होती. राज्य निवडणूक आयोगाने तसे नियोजन देखील केले होते; पण तसे झाले नाही. आयोगाने आता सर्वोच्च न्यायालयाकडे ३१ जानेवारीची मुदत वाढवून मागितली आहे.

तत्पूर्वी, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदारांनी मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या पथकांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन ठेवली आहे. त्यांच्या त्यांच्या तालुक्यातील शाळा, तेथील शिक्षक आणि त्यांचे मोबाईल क्रमांक घेऊन ठेवले आहेत. आता निवडणूक जाहीर झाल्यावर संबंधितांना ऑर्डर पाठविल्या जाणार आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होईल, त्यानंतर त्यांना मतदान केंद्रांवर ड्यूटी दिली जाईल.

महापालिका निवडणुकीत अडकल्या ‘ईव्हीएम’

नगरपालिका व महापालिकेच्या निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशातून ‘ईव्हीएम’ आल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीवेळी बॅलेट युनिटची बटणेच दबत नव्हती. सुमारे २५ टक्के मशिन काढून त्या ठिकाणी दिलेल्या अतिरिक्त मशिन्स वापराव्या लागल्या. आता अतिरिक्त मशिन शिल्लक नाहीत. महापालिका निवडणुकीनंतर प्रत्येक जिल्ह्याची गरज पाहून तेवढ्या मशिन्स द्याव्या लागणार आहेत. तत्पूर्वी, बॅलेट युनिटची बटणे दबतात का, हे पाहिले जाईल. महापालिकेतील उमेदवारांनुसार सेट केलेल्या मशिन रिसेट करून त्यातील मेमरी काढून दुसरी मेमरी बसवावी लागेल. त्यानंतर त्या मशिन जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी वापरल्या जाणार आहेत. निवडणूक लांबणीमागे ‘ईव्हीएम’ची अनुपलब्धता, हेही एक प्रमुख कारण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT