Cabinet Expansion Esakal
महाराष्ट्र बातम्या

Cabinet Expansions: भाजपकडून हालचाली सुरू! आज राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता

देवेंद्र फडणवीस काल रात्री मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी गेल्याची माहिती

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणातल्या नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदेंचं सरकार येऊन आता वर्ष होईल तरी देखील अजून पर्यंत दुसऱ्या टप्यातील मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झालेला नाही. पहिला मंत्रिमंडळ विस्तारसुद्धा जवळपास महिना-दीड महिन्याने झाला. अशातच आता भाजपमध्ये घडामोडींना वेग आला आहे. अशातच काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांच्या घरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीसाठी गेले आहेत.

आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून तात्पुरत निलंबित करण्यात आलं आहे. अशातच आता सावनेरमध्ये आशिष देशमुख यांना तिकीट मिळणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

अशातच देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. इथे बाहेरून कोणता नेता येणार नाही, इथलाच नेता असेल. सर्वांसाठी दारे उघडी आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. अशातच या भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. काल भाषणातुन देवेंद्र फडणवीस यांनी सुचक इशारा दिला होता. तर आशिष देशमुख भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

तर आज राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. जयकुमार गोऱ्हे आणि राहुल कुल आज देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले. देवेंद्र फडणवीस काल रात्री मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी गेल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपमध्ये रात्रीची खलबतं सुरू; देवेंद्र फडणवीसांची रातोरात दिल्ली वारी

आता राज्यातील सत्तसंघर्षाचा निकाल देखील लागला आहे, त्यामुळे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दौर अटपून तातडीने दिल्ली वारी केल्याची माहिती 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिली आहे.

देवेंद्र फडणवीस अवघ्या काही तासांसाठी नवी दिल्लीला जावून आले त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास ते पुन्हा नागपूरात परतले आहेत, फडणवीसांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत हायकमांड सोबत चर्चा केली असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान शिंदे गटातले अनेक माजी मंत्री पुन्हा संधी न मिळाल्याने नाराज आहेत. अनेकजण सातत्याने आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत असतात. सध्या मंत्रिमंडळात २० मंत्री आहेत. ९ शिंदे गटाचे आणि ९ भाजपाचे मंत्री आहेत.

मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त लवकरच जाहीर होण्याची शक्यता दिसत आहे. शिंदे गटातील नाराज आमदारांपैकी किती आमदारांची नाराजी दूर करण्यात एकनाथ शिंदे यशस्वी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर काही आमदारांवर विविध महामंडळांची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. जबाबदारीही द्यायची आणि नाराजीही दूर करायची असा दुहेरी नेम शिंदे-फडणवीस या माध्यमातून साधणार का? अशी चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

Bullock Cart Racing : 'किंग' ठरला सांगलीचा खिलार! बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठताच खोंडांची तुफान क्रेझ; लाख-दीड लाखाचा खोंड विकला जातोय 8 लाखांत

विशेष : इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म कसा भरावा?

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT