Beautiful City in Maharashtra 
महाराष्ट्र बातम्या

Beautiful City in Maharashtra: महाराष्ट्रातील तीन सुंदर शहरं जाहीर! नेटकऱ्यांनी जोडलं फडणवीस, शिंदे, पवार कनेक्शन

Sandip Kapde

नगरविकास खात्याचा शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. नगरविकास दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील शहरांच्या विकासावर सरकारचा भर आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नगरविकास दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यातील शहरे स्वच्छ व सुंदर दिसावी या संकल्पनेतून शासनाच्या वतीने सप्टेंबर २०२२ मध्ये एक शासन निर्णय पारित केला होता. त्याअंतर्गत राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ राबविण्यात आली होती.

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ चा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहा गटात विभागणी करण्यात आली असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या संस्थेस अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी व ५ कोटी रुपये या प्रमाणे पारितोषिके देण्यात आले.

या स्पर्धेत अ गटात देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर महापालिकेला पहिला क्रमांक मिळाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे महापालिकेला दुसरा क्रमांक मिळाला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला तिसरा क्रमांक मिळाला आहे.

‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटामध्ये नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

‘क’ वर्ग महानगरपालिका गटामध्ये नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण -डोंबिवली महानगरपालिका व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

‘ड’ वर्ग महानगरपालिका गटामध्ये पनवेल महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका व अहमदनगर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

नगरपरिषद गट -

‘अ’ व ‘ब’ वर्ग नगरपरिषद गटामध्ये शिरपूर-वरवाडे नगरपरिषद, उमरखेड नगरपरिषद व हिंगोली नगरपरिषद यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.

‘क’ वर्ग नगरपरिषद गटामध्ये वेंगुर्ला नगरपरिषद व महाबळेश्वर नगरपरिषद यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येऊन तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पवनी नगरपरिषद व सोनपेठ नगरपरिषद यांना देण्यात आले.

नगरपंचायत गटामध्ये मौदा नगरपंचायत व देवरुख नगरपंचायत यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येऊन तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देवळा (नाशिक) नगरपंचायत व बाभुळगाव नगरपंचायत यांना देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा कायम! पुढचे काही दिवस पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज काय?

Karnataka Accident: राज्यात दोन अपघातांत सात जण ठार; कोलार, चिक्कबळ्ळापुरात दुर्घटना, तिरुपतीहून परतताना काळाचा घाला

IND vs AFG : अफगाणिस्तानच्या 'त्या' कृतीने पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या! भारताचा नकाशा अन् जगासमोर आणले सत्य… नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटलांवर मध्यरात्री उपचार, सलाइन लावले

Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

SCROLL FOR NEXT