Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

Mahrashtra Politics: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपने नक्की सोबत का घेतलं? खरं कारण आलं समोर

सकाळ डिजिटल टीम, मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

Mahrashtra Politics: सोशल इंजिनिअरिंगसोबतच पॉलिटिकल इंजिनिअरिंगचा फंडा महाराष्ट्रात वापरण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. भाजपची मतांची टक्केवारी ३५ ते ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. ही टक्केवारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मदतीने ५० टक्क्यांपर्यंत नेण्याची योजना भाजपने आखली आहे.

अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही पक्षांची ५-५ टक्के मते मिळवण्याची योजना भाजपकडून आखण्यात आली आहे. तसे झाले तर भाजपची एकूण टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत जाईल. राज्यातील ४५ ते ४६ जागा जिंकण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या चमूतील विश्‍वासू नेते आमदार श्रीकांत भारतीय हे ‘महाविजय २०२४’ या अभियानाची आखणी करत आहेत.

यासाठी प्रत्येक तालुक्यात संपर्क यंत्रणा आणि कनेक्टरूम अशी रचना करण्यात येईल. शनिवारी (ता. १६) महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या भाजप पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांची बैठक नागपुरात होणार आहे. या बैठकीत आमदार, खासदार उपस्थित नसतील. नवे चेहरे आणि संघटनात्मक बांधणी, असे या रचनेचे स्वरूप असेल.

फडणवीसांची यात्रा
२६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संपल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रव्यापी यात्रा सुरू होईल. लोकसभेतील दोन किंवा तीन मतदारसंघांसाठी एक सभा असे आयोजन केले जाणार आहे.

मुंडे, तावडे सक्रिय
शनिवारी नागपुरात पंकजा मुंडे दाखल होणार असून त्या बैठकीला संबोधित करतील. नाराजी दूर ठेवत त्यांनी ओबीसी मतांचे नियोजन करणे मान्य केले आहे, असे समजते. विनोद तावडे यांनीही राज्यात लक्ष घालणे सुरू केले आहे. ते राजस्थानचा तसेच देशातला अनुभव सांगत बांधणीची सूत्रे सांगतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही या मेळाव्याला संबोधित करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT