Kelghar Ghat  sakal
महाराष्ट्र बातम्या

Kelghar Ghat : ट्रेलर वळणावर अडकल्‍याने केळघर घाटात वाहतूक कोंडी

येथील घाटात आज दुपारी महाबळेश्‍‍वरकडून साताऱ्याकडे जाणारा मोठा ट्रेलर अडकल्याने घाटात सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. याचा फटका महाबळेश्‍‍वरकडे जाणाऱ्या पर्यटकांना बसला.

सकाळ वृत्तसेवा

केळघर : येथील घाटात आज दुपारी महाबळेश्‍‍वरकडून साताऱ्याकडे जाणारा मोठा ट्रेलर अडकल्याने घाटात सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. याचा फटका महाबळेश्‍‍वरकडे जाणाऱ्या पर्यटकांना बसला.

विटा ते महाबळेश्‍‍वर या रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने कोल्हापूर, साताऱ्याहून येणारे पर्यटक हे केळघर घाटातून प्रवास करणे पसंत करतात. सध्‍या उन्हाळी हंगाम शेवटच्या टप्प्यात असून, आज विकेंडमुळे महाबळेश्‍‍वरला जाणाऱ्या पर्यटकांची चांगलीच गर्दी होती.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास केळघर घाटात काळा कड्यानजीक एका अवघड वळणावर एक महाकाय ट्रेलर साताऱ्याकडे जात होता. केळघर घाटातील रस्ता हा अरुंद असल्याने हा ट्रेलर काही काळ अडकून पडल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे घाटात वाहतूक विस्कळित झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT