IAS Pooja Khedkar sakal
महाराष्ट्र बातम्या

Pooja Khedkar : पूजा खेडकर बेपत्ता? दोनवेळा समन्स पाठवूनही चौकशीसाठी आलीच नाही

संतोष कानडे

पुणेः पूजा खेडकर प्रकरण सध्या देशभर गाजत आहे. आयएएस होऊन प्रशिक्षण घेत असलेल्या पूजाने चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप झाल्यानंतर तिचा प्रशिक्षण कालावधी थांबवला आहे. त्यानंतर या प्रकरणात यूपीएससीने पूजावर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय एक समितीदेखील तिच्या सगळ्या प्रकरणांची चौकशी करत आहे.

पूजा खेडकरने वाशिम येथे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळाची तक्रार दिली होती. यासंबंधी चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी पूजाला दोनवेळा नोटीस पाठवली परंतु ती चौकशीसाठी पुण्याला आलीच नाही. शनिवारी पूजा खेडकर चौकशीसाठी येणार होती. सुरुवातीला ती आल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात ती चौकसीसाठी आलीच नाही.

पूजाने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात स्वतःच तक्रार दिली होती. मात्र या प्रकरणात पुढे कार्यवाही होण्यासाठी तिने चौकशीसाठी हजर राहाणं अपेक्षित होतं, परंतु ती अनुपस्थित राहात आहे. यूपीएससीने तिच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याने ती बेपत्ता झाल्याचंही बोललं जातंय.

पुण्यामध्ये प्रशिक्षण कालावधीत पूजा खेडकरने अधिकाऱ्यांकडे अनावश्यक डिमांड ठेवल्या होत्या. त्यामुळे स्वतः पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तिच्याविरोधात वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर ही बातमी प्रसार माध्यमांमध्ये झळकली आणि पूजाच्या अडचणी वाढल्या.

सुरुवातीला पूजाची बदली पुण्यातून वाशिम येथे करण्यात आली. त्यानंतर तिचा प्रशिक्षण कालावधी थांबवला. आता तर यूपीएससीने तिच्यावर गुन्हा नोंद केला आहे. यावरुन पूजाची नोकरी जाणार, हे निश्चित झालं आहे.

नोकरी मिळवण्यासाठी पूजाने खोटे अपंग प्रमाणपत्र बनवले, नाव बदलून अनेकवेळा यूपीएससीची परीक्षा दिली, ओबीसी आरक्षणात बसत नसताना लाभ घेतला, असे आरोप पूजावर आहेत. पूजामुळे तिच्या आई-वडिलांचे कारनामेदेखील पुढे आलेले आहे. सध्या तिची आई मनोरमा खेडकर अटकेत आहे.

पुणे पोलिसांना पूजाला दोनवेळा चौकशीला बोलावले तरीही ती आलेली नाही. सध्या ती नॉट रिचेबल असल्याचं सांगितलं जातंय. याशिवाय तिच्यावर गुन्हा दाखल झाल्याने तिच्या अडचणी वाढल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT