Transgender students to get free education eSakal
महाराष्ट्र बातम्या

Education : राज्यातील सार्वजनिक आणि संलग्न विद्यापीठांमध्ये तृतीयपंथीयांना मिळणार मोफत शिक्षण; शिंदे सरकारची मोठी घोषणा!

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने उचललेलं हे पाऊल आहे.

Sudesh

Transgender students to get free education : राज्यातील तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मोफत उच्चशिक्षण उपलब्ध करुन देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

पाटील यांनी मंगळवारी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत एक राज्यस्तरीय बैठक घेतली होती. यावेळी सार्वजनिक आणि संलग्न विद्यापीठांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटलांनी मांडला. अशा विद्यार्थ्यांच्या ट्यूशन फीचा खर्च विद्यापीठांनी करावा असं आवाहन पाटलांनी केलं. याला उपस्थित सर्व कुलगुरूंनी सहमती दर्शवली.

इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने उचललेलं हे पाऊल आहे. तृतीयपंथीयांचा शिक्षणात समावेश सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकार एक सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना यावेळी आवाहन केलं, की तृतीयपंथी विद्यार्थ्यांसमोर असणारी आव्हाने ओळखून त्यादृष्टीने काम करावं. यामध्ये पायाभूत सुविधांची कमतरता, स्वतंत्र शौचालय नसणे, इतर विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलतेचा अभाव, गुंडगिरी सारख्या घटना - ज्यामुळे अनेक तृतीयपंथी आपली ओळख लपवतात अशा सर्व आव्हानांचा समावेश असू शकतो.

या बैठकीमध्ये विद्यापीठांच्या नॅक ग्रेडबाबत देखील चर्चा झाली. यासोबतच, नोकरी किंवा इतर गोष्टींमुळे शिक्षण सोडावं लागलेल्या व्यक्तींसाठी परीक्षा-विरहीत प्रमाणपत्र-कोर्स तयार करण्याबाबत विचार करण्याचं आवाहन चंद्रकांत पाटलांनी यावेळी उपस्थितांना केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT