Dr balaji Tambe Sakal
महाराष्ट्र बातम्या

बालाजी तांबे यांनी आयुर्वेदाला शास्त्रोक्त पद्धतीने जगासमोर मांडले : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आणि योगतज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. चिंतनशील मार्गाने अथक केलेली योगसाधना आणि आत्मसंतुलनाचा त्यांनी दाखवलेला मार्ग त्यांच्या असंख्य भारतीय आणि पाश्चात्त्य अनुयायांना सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी पथदर्शी ठरला आहे. वैयक्तिक पातळीवर मी त्यांचे आयुर्वेदिक उपचार घेऊन त्यांचा स्नेह अनुभवला. जिज्ञासू भाव आणि सातत्याने संशोधन यातून त्यांनी आयुर्वेदाला शास्त्रोक्त पद्धतीने जगासमोर मांडले. त्यांचे तत्त्वज्ञान रोजच्या मानवी जगण्याशी एकरूप झाले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांचे विशाल वैश्विक कुटुंब आज पोरके झाले आहे. डॉ. बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ''अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाने ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले: देवेंद्र फडणवीस

मुंबई : ''आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. त्यांच्या निधनाने एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे,'' अशी शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

''बालाजी तांबे यांच्याशी माझा वैयक्तिक स्नेह होता. आयुर्वेद आणि प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती यावरील अभ्यास आणि संशोधनात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे. बालाजी तांबे यांनी आयुर्वेद आणि अध्यात्म यावर अतिशय विपुल लेखन केले आणि विविध भाषांमध्ये त्याचा अनुवाद झाला. विशेषत: स्त्रियांच्या आरोग्य क्षेत्रात सुद्धा त्यांनी मोठे काम केले. योग, संगीतोपचार असे विविध प्रयोग त्यांनी केले. त्यांचे माध्यमांतील लेख वा मुलाखती या विचारप्रवर्तक असायच्या आणि म्हणूनच त्या लोकप्रिय ठरल्या. श्रोत्याला त्या मानसिक समाधान-आधार देणार्‍या असायच्या. मी बालाजी तांबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सारे सहभागी आहोत,'' असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI on Inflation: दिवाळीत महागाईचा फटका बसणार? RBI गव्हर्नरांचा मोठा इशारा; कारण काय?

NCP Politics: मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

Haridwar: कांवड भक्तांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी; मुख्यमंत्र्यांनी पाय धुवून केले स्वागत, video viral

Latest Marathi News Live Update : विरोधकांनी रांचीमध्ये JPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांशी चर्चा केली का? भाजप खासदार जगदंबिका पाल यांचा सवाल

दोघात तिसरा! अमृता आणि हिमांशूच्या नात्यात 'त्या' व्यक्तीमुळे दुरावा? नेटकऱ्यांनी थेट अभिनेत्याचं नावच घेतलं; कोण आहे तो?

SCROLL FOR NEXT