Urfi Javed Esakal
महाराष्ट्र बातम्या

Urfi Javed : उर्फी जावेद मुस्लिम असल्याने भाजपकडून टार्गेट...तृप्ती देसाई अ‍ॅक्शन मोडमध्ये

उर्फी जावेदला पोलिसांनी नोटीस बजावली आणि काल तिची चौकशी करण्यात आली

सकाळ डिजिटल टीम

मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. उर्फी जावेदने काही दिवसांपूर्वी या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांनी उर्फीवर टीका केली. तिने काहीही करावं. कुठेही जावं. पण नीट कपडे घालून जावं, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं. त्यानंतर काल उर्फी जावेदची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे.

आता या वादामध्ये भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी उडी घेत उर्फी जावेदला पाठिंबा दिला आहे. उर्फी जावेद मुस्लिम असल्यामुळेच तिला भाजपकडून टार्गेट केलं जातंय का? हे तपासलं पाहिजे. तसं असेल तर आम्ही तिच्या पाठीशी उभं राहू, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

उर्फी जावेदला पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी नोटीस बजावली त्यानंतर काल तिची पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात आली. यासंबधी प्रतिक्रिया देताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, आपला देश संविधानानुसार चालतो. उर्फीने काय कपडे घालावे आणि काय घालू नये हा तिचा प्रश्न आहे. या आधी अनेक अभिनेत्रींनी बोल्ड कपडे घातले आहेत असंही त्या म्हणाल्या आहेत.

त्यावेळी कोणी काही प्रश्न विचारले नाही. पण उर्फी जावेदलाच भाजप का टार्गेट करत आहे?; असा सवाल करतानाच उर्फी केवळ मुस्लिम असल्याने भाजप तिला टार्गेट करत आहे का? हे आपण तपासलं पाहिजे, असं तृप्ती देसाई म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smart Meter Fire Kolhapur : स्मार्ट मीटरने अचानक घेतला पेट, कोल्हापुरातील कागलमधील घटना, महावितरणचा खुलासा

ऑक्टोबरमध्ये ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार १५ एप्रिलची मतदार यादी

‘लाडकी बहीण’चे पोर्टल बंद! ६५ वर्षांनंतर लाडकी बहीणचा लाभ बंद, पण २१ वर्षे झालेल्या महिलांना करता येईना योजनेसाठी अर्ज; अपात्र महिलांकडून वसुली नाही, पण...

Pune News : गुलटेकडी परिसरात ठेकेदाराने संपविले जीवन

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

SCROLL FOR NEXT