Uday Samant esakal
महाराष्ट्र बातम्या

'माजी मुख्यमंत्र्यांचा खुर्चीसाठी थयथयाट',उद्योगमंत्री सामंत यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

केवळ खुर्चीसाठी थयथयाट सुरू असल्याची बोचरी टीका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

Manoj Bhalerao

Uday Samant on Uddhav Thackrey: राज्याच्या राजकारणात वसंतदादा पाटील यांच्यापासून ते विलासराव देशमुख यांच्यापर्यंत अनेकांची पदे गेलीत. त्यांनी कधीही थयथयाट केला नाही. उलट जनतेत जाऊन ती पदे पुन्हा मिळविली. आम्ही उठाव केल्यानंतर ज्यांची खुर्ची गेली, त्यांचा केवळ खुर्चीसाठी थयथयाट सुरू असल्याची बोचरी टीका राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

मंत्री सामंत आज शुक्रवारी (ता.२७) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शासन आपले दारी अभियानाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार इंद्रनील नाईक, आमदार नामदेव ससाणे, आमदार नीलय नाईक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सामंत म्हणाले की, पद गेल्यामुळे एखाद्यावर एवढा आकस ठेवण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांसाठी काम करीत आहेत. माजी मुख्यमंत्र्यांचा मुद्दा व टोमणा कुणाला कळतच नसल्याचेही सामंत म्हणाले.

मराठा समाजाला शाश्‍वत आरक्षण मिळावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची वेळ आली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्कीच अधिवेशन घेतील. आमचे सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने असून, आरक्षण नक्की मिळेल, असा विश्‍वास सामंत यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT