Uddhav Thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : तुझा शर्ट माझ्यापेक्षा भगवा कसा म्हणत हेही अयोध्येला गेले; फडणवीसांना टोला

रवींद्र देशमुख

नागपूर - महाविकास आघाडीच्या वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर जोरदार टीका केली. आम्ही सरकारमध्ये असताना न्यायालयाने राममंदिरांचा निकाल दिला. आता हे अयोध्येला गेले. पण सुरुवातीला हे सुरतला गेला. हिंदुत्व असतं तर आधी अयोध्येला गेले असते.

दरम्यान हे अयोध्येला गेले त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीसही गेले. फडणवीस आजपर्यंत कधी अयोध्येला गेले, हे तुम्हाला कधी आठवतं का, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच केवळ तुझा शर्ट माझ्यापेक्षा भगवा कसा, यासाठीच हेही अयोध्येला गेल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचं नाव न घेता लगावला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगाव की, भाजप आणि तुमचं काय सुरू आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याच नाही. पण यांचं हिंदुत्व हे गोमुत्रधारी आहे. आमचं हिंदुत्व राष्ट्रीयत्व असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT