Uddhav Thackeray Uddhav Thackeray
महाराष्ट्र बातम्या

...तोपर्यंत निवडणूक होऊ शकत नाही; मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांचे उत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अनेक दिवसांपासून रखडली आहे. मुख्यमंत्री उद्धव (Uddhav Thackeray) ठाकरे मंगळवारी (ता. १५) विधिमंडळात आल्यावर काँग्रेसचे मंत्री त्यांना भेटले विधानसभा अध्यक्ष निवडणूक व्हावी, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) मंजुरी देत नाही तोपर्यंत विधानसभा अध्यक्ष निवडणूक होऊ शकत नाही, असे स्पष्ट केले.

राज्य सरकारने विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी बुधवार (ता. १६) ही तारीख निश्चित केली आहे. तसा प्रस्तावही राज्यपाल कोश्यारी यांना पाठविला आहे. राज्य सरकार राज्यपालांच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होईल, असे बोलले जात होते. मात्र, सरकारचा आवाजी मतदानाबाबतच्या निर्णयावर राज्यपालांनी (Bhagat Singh Koshyari) आक्षेप घेतला होता. यानंतर राज्यपाल आणि सरकारमधील वाद चांगलाच टोकाला गेला होता.

यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात अध्यक्षपदाची निवडणूक (Election of Assembly Speaker) घेण्याचे महाविकास आघाडीने ठरवले होते. यावेळीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली नाही. त्यामुळे अद्याप अध्यक्षपदाची निवडणूक झालेली नाही. निवडणुकीसाठी राज्य सरकारने राज्यपालांच्या भेटी घेत परवानगी देण्याची विनंती केली. यानंतर राज्यपालांनी (Bhagat Singh Koshyari) सकारात्मक आश्वासन दिले. परंतु, निर्णय काही घेतला नाही.

अशात मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात आल्यावर काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींनी त्यांची भेट घेत निवडणूक घेण्याची मागणी केली. जोपर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंजुरी देत नाही तोपर्यंत विधानसभा अध्यक्ष निवडणूक होऊ शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT