Uddhav thackeray faction symbol flaming torch mashal history connection to shivsena and balasaheb thackeray  
महाराष्ट्र बातम्या

Balasaheb Thackeray: 'मशाल' चिन्हासोबत सेनेचं नातं जुनंच, बाळासाहेबांना मिळला होता मोठा विजय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात शिवसेना कोणाची यावरून सुरू असलेला वाद न्यायालयात आणि नंतर निवडणूक आयोगाच्या दारी पोहचला. दरम्यान शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरास मनाई केल्यानंतर निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे गटाला नवीन चिन्ह आणि नाव तर शिंदे गटाला नाव दिलं आहे. उद्धव ठाकरे गटाला चिन्ह म्हणून 'धगधगती मशाल' मिळाली आहे. दरम्यान या चिन्हासोबत शिवसेनेचं नातं मात्र खूप जूनं आहे.

शिवसेना आणि मशालीचा इतिहास

शिवसेनेकडे याआधी मशाल हे चिन्ह होतं, छगन भुजबळ नगरसेवक पदासाठी 1985 साली उभे असताना त्यांना मशाल हे चिन्ह मिळालं होते. तसेच 2 मार्च 1985 ला विधानसभेची निवडणूक झाली आणि भुजबळ मशाल चिन्हावर शिवसेनेचे एकमेव आमदार झाले होते.

74 नगरसेवक आले होते निवडून

यासोबतच 1985 साली जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचे ठरविले त्यावेळी देखील त्यांना मशाल हेच चिन्ह मिळाले होते. या चिन्हावर निवडणूक लढवली आणि बाळासाहेब ठाकरे यांना मोठं यश मिळालं होतं. मशाल या चिन्हावरच शिवसेनेचे 74 नगरसेवक निवडून आले आणि शिवसेनेची महापालिकेत सत्ता आली होती. दरम्यान अंधेरी पूर्व मतदारसंघातील आगामी निवडणूकीत उध्दव ठाकरेंसाठी मशाल हे चिन्ह कितपत यश मिळवून देईल याकडे सर्वाचे लक्ष असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT