Uddhav Thackeray group chandrakant khaire objection over Balasahebanchi ShivSena name alloted to Shinde group  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena: 'बाळासाहेबांची शिवसेना' नावाला ठाकरे गटाचा आक्षेप, कोर्टात जाण्याच्या तयारीत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट तसेच उद्धव ठाकरे गटाला नवीन नावे दिली आहेत. उद्धव ठाकरे यांना 'शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे' असे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळालं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांचा हा पहिला विजय असल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांकडून देण्यात येत आहेत. दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला मिळालेल्या नावावर आक्षेप घेतला आहे.

एकनाथ शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळाल्याबद्दल चंद्रकांत खैरे म्हणाले की, बाळासाहेबांच नाव त्यांना घ्यावं लागलं, त्यावरं आमचा आक्षेप असा आहे की, यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा आधिकार नाही. शिवसेना प्रमुखांच्या नावाशिवाय हे काही यशस्वी होऊ शकणार नाहीत. अनिल देसाई दिल्लीतच आहेत, ते दिल्ली हायकोर्टात ही केस मूव्ह करतील, असे खैरे म्हणाले. उद्या नव्याने याचिका दाखल करणार का असे विचारले असता उद्या बहुतेक होईल, त्यांचा प्रयत्न चालू असल्याचे खैरे म्हणाले.

बाळासाहेबांचं नाव त्यांनी (शिंदे गटाने) घेऊ नये असं आम्हाला वाटतं कारण ते उद्धव ठाकरेंचे बाळासाहेब आहेत. त्यांना तुम्ही घेता कशाला असेही खैरे म्हणाले. निवडणूकांसाठी जोरदार तयारी करू असेही खैरेंनी सांगितले.

ठाकरे पहिल्या प्रयत्नात जिंकले...

ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव मिळाले आहे. तर मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते भास्कर जाधव म्हणाले की "पहिल्याच प्रयत्नात उद्धव ठाकरे जिंकले आहेत. कारण 'उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना' या नावाची आम्ही मागणी केले होती तेच नाव आम्हाला मिळाले आहे.

तर आम्ही ज्या चिन्हांची मागणी केली होती त्यापैकीच चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पहिल्याच प्रयत्नात जिंकले आहेत. या निर्णयावर आम्ही आनंदी आहोत, समाधानी आहोत, तर बाळासाहेब ठाकरे हे नाव चोरण्याचे काही लोकांनी प्रयत्न केला परंतु ते झाले नाही. आशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT