Uddhav Thackeray Group esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाबाबत ६ आठवड्यांनी सुनावणी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - मशाल चिन्हाच्या याचिकेवर ६ आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा करत याचिका दाखल केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार होती. मात्र, समता पक्षाकडे पूर्ण कागदपत्र नसल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

या अगोदर दिल्ली उच्च न्यायालयात उदय मंडल यांनी या संदर्भात अपिल केले होते. मात्र, न्यायालयाने मंडल यांची याचिका फेटाळली होती. शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्य बाण गोठवण्यात आले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात दिल होतं.

दरम्यान निवडणूक आयोगाने काही कालावधीनंतर पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्या गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले आहे. या संदर्भात ३१ जूलै ला सुनावणी पार पडणार आहे.

दुसरीकडे समता पक्षाचा जनाधार घटल्यानं निवडणूक आयोगाने समता पक्षाचं निवडणूक चिन्ह मशाल हे गोठवले होते. हे चिन्ह निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला तात्पुरत्या स्वरूपात दिले आहे. मात्र, कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह गोठवल्यानंतर कोणत्याही पक्षाला दिलं जात नाही, असा दावा समता पार्टीने केला आहे. यावर सहा आठवड्याने सुनावणी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Cyclonic Winds : अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे पावसाची शक्यता; पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Sugar Stock Limits: साखरेच्या साठवणुकीवर केंद्राचे निर्बंध; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; पंधरा दिवसच साठा ठेवता येणार

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

SCROLL FOR NEXT