Uddhav Thackeray News 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray News : "उद्धव ठाकरेंचा भाजपसोबत येण्यासाठी प्रयत्न"; भाजप आमदाराचा मोठा दावा

भाजप आमदाराच्या दाव्याने मोठी खळबळ माजली आहे

Sandip Kapde

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे गटाला कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. त्यामुळे ठाकरेंचा पाय आणखीच खोलात जात आहे. १६ आमदार अपात्र आणि पक्ष, चिन्हाबातत सुनावणीवर तात्काळ सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे. तसेच स्पष्ट तारीख देण्यास देखील कोर्टाने नकार दिला आहे. दरम्यान भाजप आमदार नितेश राणे यांनी मोठा दावा केला आहे.

उद्धव ठाकरे आणि त्यांचे काही जवळचे लोक, भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कुठल्याही अटी शर्ती ठेऊ नका पण आम्हाला सोबत घ्या, अशा पद्धतीचा उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजपच्या नेत्यांकडे गेला आहे. त्या संदर्भात दिल्लीत बैठक घेण्याचा प्रयत्न झाला, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. (Uddhav Thackeray News)

नितेश राणे म्हणाले, भाजपकडून उद्धव ठाकरे यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. कारण आमची भूमिका स्पष्ट आहे एकदा कुणी बेईमानी केली तर त्याच्याबरोबर परत कधी जायचे नाही. (latest marathi news)

उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर अनेक नेत्यांनी ठाकरेंना राम-राम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan resignation : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

सुबह हो गई मामू! प्रधानांचा राजीनामा, अभिजीत दीपकेची पहिली प्रतिक्रिया

Dharmendra Pradhan resignation letter : धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात नेमकं काय लिहलं; "हा माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही"

Delhi Student Protest : दिल्लीतील आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण...पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या

Live Updates Marathi : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, CM फडणवीस दिल्लीकडे रवाना

SCROLL FOR NEXT