Ramdas Kadam Uddhav Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: "बॉम्बस्फोट करणाऱ्यांना बरोबर घेत..." उद्धव ठाकरेंवर रामदास कदमांची एकेरी भाषेत टीका

Ramdas Kadam: दरम्यान कार्यक्रमाला सुरूवात होण्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत खळबळजनक आरोप केले आहेत.

आशुतोष मसगौंडे

शिवसेनेचा आज आज 58 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने दोन्ही शिवसेना मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. यानिमित्ताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा ष्मुखानंद सभागृहात तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एनएससीआय सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दरम्यान कार्यक्रमाला सुरूवात होण्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत खळबळजनक आरोप केले आहेत.

यावेळी रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांना बरोबर घेत निवडणुकीत मते मागितली. उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे. ज्या शिवसेना प्रमुखांनी जेव्हा काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल तेव्हा दुकान बंद करणे असे म्हटले होते. त्याच काँग्रेसच्या पंजावर उद्धव ठाकरे मतदान करून आले आहेत. त्यांना शिवसेना प्रमुखांचे नाव घेण्याचा अधिकार नाही."

2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि ठाकरे मुख्यमंत्री झाले. मात्र, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्याबरोबर 40 आमदार घेत भाजपशी युती केली. तेव्हापासून खरी शिवसेना कोणाची याबाबत लढाई सुरू आहे.

यामध्ये न्यायालयीन लढाई सुरू असली तरी दोन्ही पक्षातील नेते सतत एकमेकांवर टीका करत आपणच कसे बरोबर आहोत हे सांगत असतात.

नुकत्याच पारपडलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत 9 जगांवर विजय मिळवला. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महायुतीच्या माध्यमातून 7 जागा जिंकल्या.

दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीचा धुव्वा उडवत 30 जगांवर दणदणीत विजय मिळवला.

यामध्ये सर्वाधिक 13 जागा काँग्रेसने जिंकल्या तर ठाकरेंच्या शिवसेनेने आणि भाजपने प्रत्येकी 9 जागांवर विजय मिळवला. गेल्या वर्षी पक्ष फुटूनही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी करत लढवलेल्या 10 जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवला. तर अजित पवार यांच्या राष्ट्रावादीला 1 जागा मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT