Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा! निवडणूक आयोगाने दिली 'ही' परवानगी

Shivsena (UBT) Latest News : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे.

रोहित कणसे

नवी दिल्ली : राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला यापुढे पक्षाला निधी स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आता निधी स्वीकारता येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने निधी स्वीकारण्यास ही मंजुरी दिली असून शरद पवार यांच्या मागणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असे दोन गट आमने सामने उभे ठाकले. यानंतर निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीमध्ये शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देखील एकनाथ शिंदे यांनी मिळालं.

यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह स्वीकारावे लागले. दरम्यान आतापर्यंत उद्धव ठाकरेंच्या या पक्षाला निधी स्वीकारण्यास परवानगी नव्हती. यासाठी पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती, अखेर आज ठाकरेंच्या पक्षाला निधी स्वीकारण्यास परवानगी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Board Exam Paper : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ! प्रश्नपत्रिका आता फक्त ३-४ पानांचीच, मंडळाची १८ कोटींची बचतही होणार

ग्रामीण मनोरंजनासाठी नवे दालन! ‘किस्सा शुरू टॉकीज’मुळे आता गावागावांत घरबसल्या पाहाता येणार नवीन चित्रपट

IPL 2026 फायनलनंतर मोठी घटना! गुजरात टायटन्सच्या बसला आग, वाचा नेमकं काय घडलं?

Shirdi: एसटी-कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू, ११ जखमी; लेकीच्या वाढदिवसाला निघालेल्या वडिलांसह काकावर काळाचा घाला

Latest Marathi News Update : विषारी दारु प्रकरणात १५ मृत्यू, सीआयडीची माहिती

SCROLL FOR NEXT