महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : सुनील तटकरेंचा खळबळजनक दावा ; म्हणाले ठाकरेंची भाजप सोबत... !

सकाळ डिजिटल टीम

Sunil Tatkare : महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भारतीय जनता पक्षासोबत सरकार बनविण्याची तयारी होती, अशी माहिती शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) संजय राऊत यांनीच आम्हाला दिली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.

'सामना' दैनिकात सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याविषयी वाईट लिहून येत असल्याचा उल्लेख करून तटकरे यांनी हा दावा केला.

"मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत राज्यातील काही विषयांवर चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यास गेले होते. या भेटीनंतर ठाकरे यांच्या मनात भाजप सोबत जाऊन सरकार बनविण्याचा विचार सुरु झाला होता.

त्यानंतर संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या भेटीची वेळ मागितली होती. राऊत यांनीच आम्हाला याबाबत माहिती दिली होती. बैठकीला एकनाथ शिंदे, तसेच मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते," असेही त्यांनी सांगितले.

सुप्रिया सुळेही लक्ष्य

महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत मांडले जात असताना खासदार सुनील तटकरे हे उद्योगपतीच्या घरी आरती करण्यात व्यग्र होते, या सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, "ज्यांचे संपूर्ण आयुष्य उद्योगपतींच्या घरच्या आरत्या करण्यात गेले त्यांनी मी केलेल्या आरती संदर्भात बोलू नये," असा टोला तटकरे यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT