Rashmi Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : रश्मी ठाकरेंमुळे शिंदे - ठाकरे गट भिडणार? ठाणे दौऱ्याबद्दलची भीती

रश्मी ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेही ठाणे दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांमध्ये वारंवार खटके उडत असतात. हे दोन्ही गट पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन्ही गटांमध्ये पुन्हा खटके उडण्याचीही शक्यता आहे. पण यासाठी कारण ठरणार आहेत रश्मी ठाकरे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाण्यामध्ये जाणार आहेत. यावेळी त्या एकनाथ शिंदेंच्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांची मानाची देवी, अशी टेंभी नाका इथल्या जय अंबे देवीची ओळख आहे. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांनी या देवीची स्थापना केली होती. याच देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे जाणार आहे.

सध्याचं तापलेलं राजकीय वातावरण पाहता रश्मी ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने कालच दिलेल्या निकालामुळे ठाकरे गटामध्ये नाराजीचं वातावरण आहे. तर दुसरीकडे शिंदे गटामध्ये काहीसं उत्साहाचं वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT