Buldhana Bus Accident Esakal
महाराष्ट्र बातम्या

Buldhana Bus Accident : 'बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत', उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावलं

बुलढाण्यामध्ये एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला

अंकिता खाणे (Ankita Khane)

बुलढाण्यामध्ये एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातातून आठ प्रवाशी सुखरुप बचावले आहेत. ही खासगी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी हा भीषण अपघात घडला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यामधील आठ प्रवासी सुखरुप आहेत. या अपघातानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

'बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आता पर्यंत 300 हून जास्त प्रवासी अपघातामध्ये मरण पावले आहेत', असं उद्धव ठाकरे म्हणालेत.(Latest Marathi News)

'सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.(Latest Marathi News)

या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या अपघाताच्या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तर अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Solapur Vidhansabha BJP: सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपचा सस्पेन्स कायम; उमेदवारीवरून भाजपमध्ये चुरस, कोणाला मिळणार संधी?

Pune Medical College: दोन तासांचे काम; महिन्याचा दाम, पुण्यातील अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांचा अनोखा फंडा

"आमिर आणि माझ्या नात्याला नाव मिळालं नाही" पूजा भट्टचा धक्कादायक खुलासा; नात्याबद्दल म्हणाली..

SCROLL FOR NEXT