महाराष्ट्र बातम्या

Unified Pension Scheme: मोठी बातमी! नवीन पेन्शन योजनेच्या खर्चाला राज्य शासनाची मान्यता; कर्मचारी संघटनांची भूमिका महत्त्वाची

Central Government: पेन्शनसाठीच्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली आहे. वेळोवेळी येणाऱ्या वेतन आयोगाप्रमाणे निवृत्तिवेतनात सुधारणा होणार का? याबाबत सध्यातरी स्पष्टता दिसत नाही. केंद्र शासनाच्या योजनेबाबतच्या अटी, शर्ती आल्यानंतर कर्मचारी संघटनांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

संतोष कानडे

UPS: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने यूपीएस अर्थात एकीकृत पेन्शन योजना लागू केली आहे. या योजनेमुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना हक्काच्या पेन्शनचा लाभ होईल. त्यासाठी जुन्या पेन्शन योजनेत सरकारने बदल केले आहेत. तशीच योजना महाराष्ट्र सरकार आणणार आहे. त्यासाठीच्या खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी २४ ऑगस्ट रोजी एकीकृत निवृत्तिवेतन योजना (यूपीएस) लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर राज्यातही ‘यूपीएस’ जशीच्या तशी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या अनुषंगाने येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली आहे. वेळोवेळी येणाऱ्या वेतन आयोगाप्रमाणे निवृत्तिवेतनात सुधारणा होणार का? याबाबत सध्यातरी स्पष्टता दिसत नाही. केंद्र शासनाच्या योजनेबाबतच्या अटी, शर्ती आल्यानंतर कर्मचारी संघटनांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

या नीवन योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर निवृत्तीपूर्वीच्या नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल.

अशी आहे नवीन योजना?

  • जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान 50 टक्के रक्कम मिळणार

  • पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी 60 टक्के रक्कम मिळते

  • जर 10 वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचा-यांना 10,000 रुपये पेन्शन मिळेल

  • कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक पर्याय निवडायचा अधिकार असेल

  • पेन्शनमध्ये सध्या कर्मचाऱ्यांचा 10 टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा 14 टक्के हिस्सा आहे

  • यापुढे आता केंद्र सरकारचा 18 टक्के हिस्सा असेल. नवीन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Tukaram Mundhe: बोगस दिव्यांगांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाई होणार?

World Record : भारताने मोडला रिकी पाँटिंगच्या ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगात अशी अविश्वसनीय कामगिरी करणारी पहिली टीम

Viral Video: धावत्या ट्रेनमधील स्टंटवर नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले धाडस की..! पाहा व्हायरल व्हिडिओ

IND vs PAK: भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचं 'धुरंधर' स्टाईल सेलिब्रेशन अफगाणिस्तान अन् बलुचिस्तानमध्ये? Video होतायेत Viral

SCROLL FOR NEXT