Narayan Rane  ssakal media
महाराष्ट्र बातम्या

अटकेनंतर नारायण राणे यांचे पहिले ट्विट

कार्तिक पुजारी

मुंबई- भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना पोलिसांनी अटक केली आहे. राणे यांच्या अटकेनंतर त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री गुन्हा दाखल करण्यासाठी कलमं शोधत आहेत. उद्धव ठाकरे सचिवांना कलमं विचारत आहेत, असं उपरोधात्मक ट्विट राणे यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आले आहे. असे असले तरी काही मिनिटातच हे ट्विट डिलिट करण्यात आले. (Maharahtra Latest News)

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आले असून त्यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राणेंना पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. राणे यांच्याकडून मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. पण, कोर्टाने यावर तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला. त्यामुळे राणे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर अखेर त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाच्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. हा नक्की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यांनतर त्यांनी याबाबत मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा विचारणा केली. त्यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन असल्याचं सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं. यामुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती, असं राणे म्हणाले. यानंतर राज्याचे राजकीय वातावरण तप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

Radhanagari Dam Water Level : गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

SCROLL FOR NEXT