पीएच. डी. प्रवेशासाठी यंदा पेट ऑनलाइन Sakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यापीठाची 21 जुलैला ‘पेट’ परीक्षा! गुरुवारपासून 6 जुलैपर्यंत अर्ज करता येणार; यंदा प्रथमच घरी बसून देता येणार विद्यार्थ्यांना ‘ॲन्ड्राईड वेब’ने परीक्षा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ‘पीएच.डी.पूर्व ‘पेट’ २१ जुलैला घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यंदा प्रथमच विद्यापीठाने ही परीक्षा ॲन्ड्राईड वेब बेस्ड पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ‘पीएच.डी.पूर्व ‘पेट’ २१ जुलैला घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यंदा प्रथमच विद्यापीठाने ही परीक्षा ॲन्ड्राईड वेब बेस्ड पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परदेशातील विद्यार्थ्यांसह देशांतर्गत कोणत्याही विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची ‘पेट’ देता येणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यावेळी ‘पीएच.डी.’ च्या जवळपास ४७४ जागा असणार आहेत. ‘पीएच.डी’पूर्वीची पेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १३ जूनपासून अर्ज करण्याची लिंक खुली होणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येतील. ‘पेट’साठी दोन पेपर असतात, त्यातील पहिला रिसर्चचा पेपर सकाळच्या सत्रात तर दुसरा संबंधित विषयाचा पेपर दुपारच्या सत्रात होणार आहे. विद्यार्थ्यांना घरी बसून त्यांच्या ॲन्ड्राईड मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपवरूनही देता येणार आहे. पण, कॅमेऱ्यासमोरून दोनदा विद्यार्थी हलला किंवा बाजूला झाला तर तो बाद ठरविला जाणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. पेपर सोडविण्याची प्रत्येकी एक तासाचा वेळ असणार आहे.

विद्यार्थ्यांनी ‘हे’ आवर्जून लक्षात ठेवावे

  • २१ जुलैला होईल ‘पीएच.डी.’पूर्व पेट परीक्षा

  • सकाळ व दुपार अशा दोन सत्रात होतील ‘पेट’चे दोन पेपर

  • ऑनलाइन लॉगिन केल्यावर पेपर सोडविण्यासाठी असेल एक तासाचा वेळ

  • १८ ते २० जुलैला होईल विद्यार्थ्यांचीच पूर्व तयारीची ऑनलाइन मॉक टेस्ट

  • ‘पेट’साठी वेब बेस्ड सिस्टिम; देशातील- परदेशातील विद्यार्थ्यांना देता येईल घरबसल्या ‘पेट’

एकापेक्षा दोन विषयातून पेट देणाऱ्यांसाठी...

एका विषयातून ‘पेट’ देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २१ जुलैला परीक्षा देता येणार आहे. पण, ज्या विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक विषयातून पेट द्यायची आहे, त्यांची परीक्षा २२ जुलैला होणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना ‘पेट’साठी १३ जून ते ६ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

विद्यार्थ्यांना १३ जूनपासून अर्ज करता येतील

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून २१ जुलैला ‘पेट’ घेतली जाणार आहे. ‘पीएच.डी’च्या जवळपास साडेचारशेपर्यंत जागा आहेत. विद्यार्थ्यांना १३ जूनपासून अर्ज करता येतील. त्यांची ‘पेट’ पूर्वीची तयारी म्हणून १८ ते २० जुलैला मॉक टेस्ट होईल. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे.

- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT