NCP Crisis Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची आज बैठक; शरद पवार-अजित पवार एकत्र येणार?

या बैठकीला जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील उपस्थित राहण्याची शक्यता आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. पक्षात फूट पडली. त्यानंतर पक्ष चिन्ह आणि नाव कोणाचं यासंबधीचे प्रकरण निवडणूक आयोगासमोर गेले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आज शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

कार्यकारी मंडळाचे सदस्य असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या बैठकीकडे सामान्यांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. तर या बैठकीला इतर नेतेही उपस्थित असणार आहेत.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार आहेत. दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली होत असते. पुण्यातील मांजरी याठिकाणी ही बैठक पार पडणार आहे. अजित पवार या बैठकाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य जयंत पाटील आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाची चर्चा आहे.

शरद पवार की अजित पवार, खरी राष्ट्रवादी कोणाची? ६ ऑक्टोबरला होणार सुनावणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. फुटीचे हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले आहे. आम्ही खरी राष्ट्रवादी असा दावा अजित पवार गटाने निवडणूक आयोगासमोर केली. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फूट पडल्याचं मान्य केलं असून दोन्ही गटांना ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT