महाराष्ट्र बातम्या

राणेंच्या अटकेसाठी अनिल परबांचा पोलिसांवर दबाव?, व्हिडिओ व्हायरल

नामदेव कुंभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी मंगळवारी नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. रात्री साडेदहाच्या सुमारास कोर्टाने त्यांना जामिनावर सोडलं. मात्र, राणे यांच्या विधानानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. नाशिक, पुण्यासह महाडमध्येही राणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, राणे यांना अटक करण्याचा आदेश दिला कुणी? याबाबत चर्चा सुरु झाली. प्रसारमाध्यमांमध्ये अनिल परब यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते पोलिसांना राणे यांना अटक करण्याचा आदेश देत असल्याचं दिसतेय. याबाबत नालासोपारा येथे भाजपने तक्रार दाखल केली आहे. राणे यांना त्रास देण्यासाठी षडयंत्र रचल्याचं सांगितलं जातेय.

राणे यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना भाजपने अटक वॉरंट मागितलं. पोलिसांकडे कोणतेही अटक वॉरंट नसल्याचा आरोप यावेळी भाजपने केला होता. तसंच पोलिसांवर राजकीय दबाव आहे, कारवाई करण्याचे आदेश येत आहेत, असंही भाजप नेते म्हणत होते. यानंतर अनिल परब यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अनिल परब यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पोलिसांचे फोन येत होते. यावेळी त्यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्याचे यामध्ये दिसतेय. मात्र, समोर कोण बोलत होतं? हे अस्पष्ट आहे. TV 9 चा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडिओत?

हॅलो, काय करताय तुम्ही लोकं??

नाय पण ते करावं लागेल तुम्हाला.. तुम्ही.. घेताय की नाही ताब्यामध्ये?

ऑर्डर कसली मागतायेत ते?

अहो कोर्टाने जे काय आहे ते....

हायकोर्ट आणि सेशन कोर्ट दोघांनीही त्यांचा जामीन नाकारला आहे.

पण मग घ्या ना.... पोलीस फोर्स वापरुन करा… अहो वेळ लागणार मग कोर्टबाजी चालूच आहे ना त्याची

ठिकाय.. ओके

फोन बंद झाल्यानंतर भास्कर जाधव अनिल परबांना म्हणतात, नारायण राणेला ताब्यात घेतलाय वाटतं..

मग अनिल परब.. भास्कर जाधवांना म्हणतात, घरात बसलाय, पोलिसांनी वेढा घातलाय, पोलीस आतमध्ये गेले तेव्हा धक्काबुक्की झाली

आता पोलीस ओढून बाहेर काढतायेत..

एबीपी माझाने सुत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली. भविष्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात असे वक्तव्य करु नये, यासाठी राज्य सरकारने पावले उचलली. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. त्यानुसार, राज्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT