BSP 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : बसप लढवणार सर्व जागा स्वबळावर

अनिल जमधडे

औरंगाबाद - बहुजन समाज पक्ष (बसप) राज्यातील विधानसभेच्या संपूर्ण 288 जागा स्वबळावर लढणार आहे. गुरुवारपासून (ता. बारा) विदर्भातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरवात होणार असल्याची माहिती पक्षाने प्रसिद्धिपत्रकाद्वो दिली. 

पत्रकात म्हटले, पक्ष राज्यात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार आहे. विदर्भातील 62 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या 12, 13 व 14 सप्टेंबरला नागपुरातील बसपच्या विभागीय कार्यालयात होणार आहेत. मुंबई, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा या विभागातील जागेसाठी 16 ते 20 सप्टेंबरपर्यंत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मुंबईच्या प्रदेश कार्यालयात होणार आहेत. इच्छुक उमेदवारांची मुलाखत केंद्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रामआचल राजभर, केंद्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ आणि प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे घेणार आहेत. यावेळी संबंधित झोनचे इनचार्ज उपस्थित राहतील. औरंगाबाद झोनसाठी दोन इनचार्ज डॉ. ना. तु. खंदारे, प्रदेश महासचिव तथा औरंगाबाद झोन इनचार्ज रवींद्र गवई, जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे उपस्थित राहतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सुप्रीम कोर्टात अचानक तणाव; सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले... तरुण वकिलाने नेमकं काय केलं?

Kerala Minister Controversy : बेडरुममध्ये महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत मंत्री, पत्नीने रंगेहात पकडताच म्हणाला- माझे ५ हजार अफेअर्स, कुणी...

Pune : भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर येताना दिसली, मागच्याने उडी मारली; दुचाकी चालकाला उडवलं, एकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचा 1098 कोटींचा अर्थसंकल्प सादर; करवाढ नाही

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात आज 1 तोळा सोन्याचा दर किती? पाहा ताजे भाव

SCROLL FOR NEXT