Rahul Narvekar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Narvekar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं सूचक वक्तव्य, 'लवकरच क्रांतीकारक निर्णय...'

मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असं वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केलंय

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आमदार निलंबनाचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष १६ आमदारांच्या अपात्रतेवर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं असतानाच त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असं राहुल नार्वेकर यांनी म्हंटलं आहे. (Latest Marathi News)

तर 'निर्णय आत्ता सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असंही नार्वेकरांनी म्हंटलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.(Marathi Tajya Batmya)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय म्हणाले?

बाळासाहेब देसाईंप्रमाणे मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन. आता निर्णय सांगणार नाही पण मेरीटच्या आधारावर निर्णय देणार असंही नार्वेकर यांनी म्हंटलं आहे.

1977 साली माझा जन्म झाला आणि याच साली स्वर्गीय बाळासाहेब देसाईंवर विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. बाळासाहेब देसाईंनी ज्याप्रमाणे अनेक क्रांतीकारी निर्णय आपल्या राजकीय आयुष्यावर घेतले, त्यातूनच शिकून कदाचित मीदेखील लवकरच क्रांतीकारी निर्णय घेईन", असं ते म्हणाले.(Latest Marathi News)

स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यावरील 'दौलत' या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त केलेल्या भाषणात नार्वेकर यांनी सत्ता संघर्षाच्या कोर्टाच्या निकालानंतर आमदारांच्या निलंबनाबाबतच्या प्रकरणावर दिलेले हे अप्रत्यक्ष संकेत आहे. राहुल नार्वेकरांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.(Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT