NCP BJP 
महाराष्ट्र बातम्या

चक्क भाजपमधून आऊटगोईंग; माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठे नेते एकापाठोपाठ भाजपमध्ये जात असताना उपराजधानीत मात्र उलटी गंगा वाहत असल्याचे आज बघायला मिळाले. भाजपचे हिंगण्याचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेने आज जोर पकडला.

एका हॉटेलमध्ये आज सकाळी विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रमेश बंग यांची भेट घेतली. भेटीतील चर्चेचा तपशील बाहेर येऊ शकला नाही. पण विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविण्यासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.

2009 मध्ये घोडमारे भाजपकडून निवडून आले होते. तरीही 2014 मध्ये मात्र पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांना थांबण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यावेळी त्यांना विधानपरीषदेचे आश्‍वासनही देण्यात आल्याची माहीती आहे. कदाचित ते पाळले गेले नाही आणि यावेळी सुद्धा भाजपकडून उमेदवारी मिळण्याची कुठलीही शक्‍यता नाही. त्यामुळे घोडमारेंनी हे पाऊल उचलले असावे, अशी शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा उद्या नागपुरात येणार आहे. काटोल येथील जाहीर सभा आटोपल्यानंतर ही यात्रा नागपुरात प्रवेश करेल. दक्षीण नागपूर आणि पूर्व नागपुरात सभा होणार आहेत. यापैकी एखाद्या सभेत विजय घोडमारे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्‍यता सुत्रांकडून वर्तविण्यात आली.

यासंदर्भात श्री घोडमारे यांच्याशी संपर्क साधला असता, "माझे घर हॉटेल रॅडीसन ब्ल्यूच्या बाजुलाच आहे. दररोजप्रमाणे मी सकाळी फीरायला निघालो होतो. दरम्यान मला जयंत पाटील आणि रमेश बंग भेटले. आमच्यात राजकीय विषयांवर चर्चा रंगली. चार राजकीय लोक भेटले की राजकीय चर्चा होतातच. पण मी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. काही घडामोडी असतील तर तुम्हाला नक्की सांगू, असे त्यांनी "सरकारनामा'ला सांगितले. आता येवढे मोठमोठे नेते पक्षांतर करीत आहेत, तर आपणही केले तर वावगे काय, असे सुचक विधानही त्यांनी बोलता-बोलता केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : माजलगावच्या कॅनॉलमध्ये अज्ञात मृतदेह पाईपलाइनला अडकला

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT