devendra fadnavis eknath shinde and vijay vadettivar 
महाराष्ट्र बातम्या

Vijay Vadettivar : मलिदा खायचा असेल तर मिळून खातात, पण...; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Politics : विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करताना सगळं हास्यास्पद असल्याचं म्हटलं. तसेच पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. मंत्रिमंडळ विस्तार व पालकमंत्री नियुक्तीसाठी एवढा वेळ होतोय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वडेट्टीवार म्हणाले की, आता कोल्ड वॉर सुरू झाला आहे. कालच्या झालेल्या मंत्रालयाच्या बैठकीतून आपल्याला दिसल असेल तीन दिशेने तीन तोंड आहेत. केवळ सत्तेसाठी एकमेकांकडे बघतात. मलिदा खायचं असेल तर मिळून खातात, पण जनतेच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी यांना वेळ नाही.

28 मंत्री कार्यरत आहेत. 28 मंत्री 28 जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून जाऊ शकले असते. जनतेला न्याय देऊ शकले असते, परंतु तिथे पालकमंत्री नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करावे लागतं म्हणजेच पालकमंत्री रिकामा आहे. राहुल गांधी नावाची भीती संपूर्ण भाजपला वाटत आहे, गांधींनी, नेहरूंनी या देशासाठी बलिदान दिल आहे. त्यामुळे गांधी नावाची दहशत अजूनही भाजपला आहे. जसं मुघलांसाठी धनाजी आणि संताजी दिसायचे तशीच दहशत भाजपने घेतलेली आहे.

अविश्वास ठरावाच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींनी केवळ काँग्रेसवर ताशेरे ओढले. त्यांनी काय केलं, त्यांच्या कोणत्या उपलब्धी ते काही ते बोलले नाही. केवळ भाषणातून काँग्रेसचा विरोध केला. ज्या मणिपूर मुद्द्यावर अविश्वास ठराव आणला होता, त्यावर ते पहिले दीड तास काहीच बोलले नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

या देशाने पाहिल आहे, या देशाचे गृहमंत्री किती ठासून खोट बोलतात आणि देशाला किती चुकीची माहिती देतात. हे कलावतीच्या कालच्या स्टेटमेंट वरून आपल्याला समजले आहे. राहुल गांधींचा सामाजिक काम आणि जो शब्द आहे, तो पक्का आहे. हे देशवासीयांना माहित आहे. केवळ कलावतीच नाही तर निर्भयाच्या भावाला पायलट करण्याचं काम राहुल गांधीनी पूर्ण केल आहे. म्हणजे या देशात सत्य नाही तर असत्य बोलून देश चालवला जात आहे. हे गृहमंत्र्यांच्या भाषणातून देशाला कळून चुकल, असंही वडेट्टीवार यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

What is The Significance Of Pandharpur Wari? पाऊले चालती पंढरीची वाट...

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

SCROLL FOR NEXT