वडेट्टीवार-बावनकुळे e sakal
महाराष्ट्र बातम्या

'महत्वाच्या बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांचे तोंडच वांझोटे'

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सध्या ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) मुद्दा गाजतो आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण परत मिळावे यासाठी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक झाली. मात्र, त्याबाबत ओबीसी नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी 'ओबीसींची बैठक वांझोटी होती' अशी टीका केली आहे. त्यालाच आता ओबीसी नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay wadettiwar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

विजय वडेट्टीवार आज नागपूर दौऱ्यावर आहेत. ओबीसी आरक्षणावरून बावनकुळेंना उत्तर देताना म्हणाले, की 'महत्वाच्या बैठकीला वांझोटी बैठक म्हणणाऱ्यांचे तोंडच वांझोटे आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आतापर्यंत दहा बैठका झाल्या आहेत. उलट ओबीसी आरक्षणासाठी दोन-तीनच बैठका झाल्या आहेत. कोणाच्या किती बैठका झाल्या हे महत्त्वाचे नसून आरक्षण मिळणे महत्त्वाचा आहे.'

कायदा आणि न्यायाचे काही मुद्दे समोर आले आहेत. इम्पेरिकल डेटा समोर आल्यानंतर काही जिल्ह्यात आरक्षण शून्य होणार आहे. काही जिल्ह्यात आरक्षण आताच्या तुलनेत कमी होईल, तर काही जिल्ह्यात आताच्या तुलनेत वाढणार आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर कायदा आणि न्यायव्यवस्थेचे मत जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढच्या शुक्रवारला या बाबतीत दुसरी बैठक होईल. ती अंतिम बैठक असणार आहे. याबाबत निर्णय पुढील शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत होईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत महत्त्वाची चर्चा झाली असल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितले. ओबीसी आरक्षण कायम ठेवून निवडणुका व्हाव्यात यावर सर्वांची सहमती देखील झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT