Vijay Wadettiwar esakal
महाराष्ट्र बातम्या

Opposition Leader : ''विरोधी पक्षनेता निवडला की तो विरोधी पक्षात जातो...'' वडेट्टीवारांच्या निवडीनंतर थोरात थेटच बोलले

संतोष कानडे

मुंबईः महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद चार वर्षांनंतर काँग्रेसकडे जात आहे. या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन नेत्यांची नावे चर्चेत होती. अखेर काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केलेली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, काँग्रेस पक्षाने आज विजय वडेट्टीवार यांचं नाव विरोधीपक्ष नेते पदासाठी निश्चित केलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यासाठी पत्र दिले आहे. यापूर्वी विरोधीपक्ष नेता निवडला गेला की तो इतर पक्षात जातो, हा इतिहास खरा असला तरी आमच्याकडे तसं काही होणार नाही. विजय वडेट्टीवार हे काँग्रेस विचारसरणीचे आहेत, असं थोरातांनी स्पष्ट केलं.

बाळासाहेब थोरांतांचा रोख नेमका कुणाकडे? अशा चर्चा यानिमित्ताने महाराष्ट्रात सुरु झालेल्या आहेत. विरोधी पक्षनेते पदावर राहून, पक्षांतर अथवा बंडखोरी केलेल्यांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ शिंदे, अजित पवार या नेत्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता पद काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. विधीमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच राहणार आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर पक्षाने हा निर्णय जाहीर केला.

काँग्रेसमध्ये असलेल्या दुसऱ्या फळीतील नेत्याकडे ही जबाबदारी मिळण्याची शक्यता याआधी वर्तवण्यात आली होती. सुनील केदार, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, संग्राम थोपटे यांच्या नावाची काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा होती. त्यानुसार आज विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर बाळासाहेब थोरात काँग्रेसचे गटनेते राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan resignation : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

Delhi Student Protest : दिल्लीतील आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण...पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या

Live Updates Marathi : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, CM फडणवीस दिल्लीकडे रवाना

तरुण कीर्तनकार मुलगी अन् रिंगणात बसलेले वारकरी; 'पाच फुटाचा बच्चन' मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर; कोण आहे ही कलाकार?

देशभरात रविवारी कँडल मार्च, CJPची घोषणा; विद्यार्थी-पालकांसह समर्थकांना सहभागी होण्याचं आवाहन

SCROLL FOR NEXT