महाराष्ट्र बातम्या

विनायक राऊत यांच्या घरावर हल्ला, राणे समर्थकांवर आरोप

नामदेव कुंभार

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर मंगळवारी राज्यभर अभूतपूर्व असा महा‘राडा’ झाला. एकीकडे शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते रस्त्यांवर परस्परांना भिडले असताना राज्य सरकारने राणे यांना अटक केली. या घटनेचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तीव्र पडसाद उमटले. पोलिसांनी राणे यांना रात्री उशिरा महाड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुमारे सव्वा तासाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. नारायण राणे यांच्या अटकेच्या कारवाईचं जोरदार समर्थन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे. त्यानंतर आता विनायक राऊत यांच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे.

विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील घरावर सोडा बॉटल फेकल्याची माहिती मिळाली आहे. चार अज्ञात बाईकस्वारांनी विनायक राऊत यांच्या सिंधुदुर्गातील तळगाव इथल्या बंगल्यावर सोडा बॉटल फेकल्याची माहिती मिळतेय. सोडा बॉटल फेकल्यानंतर हे चौघेही पळून गेले आहेत. दरम्यान, या हल्ल्यात राऊत यांच्या बंगल्याचं कुठलंही नुकसान झालेलं वृत्त नाही. विनायक राऊत यांच्या बंगल्यावर पोलिसांचा बंदोबस्त असताना हल्ला झाल्याचं समजतेय. विनायक राऊत यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. विनायक राऊत यांच्यावर झालेला हा हल्ला राणे समर्थकांनी केला असल्याचा आरोप, शिवसैनिकांनी केला आहे. यावर आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येतेय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

असे घडले अटकनाट्य
मंगळवारी सकाळपासून राणे यांच्या अटकेची चर्चा सुरू होती. भाजपलाही याची कुणकूण लागलीच होती रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयात व मुंबई उच्च न्यायालयात अटक टाळण्याचे राणेंचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई करून त्यांना संगमेश्वर पोलिस ठाण्यात नेले. तेथून त्यांना महाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक राणेंच्या अटकेसाठी पुढे आले; मात्र उच्च न्यायालयाचा निकाल आला नसल्याने सगळेच वेटिंगवर होते. अखेर तिथलाही जामीन अर्ज फेटाळल्याची अधिकृत माहिती आल्यानंतर अटकेच्या हालचालींना वेग आला. अखेर राणेंना ताब्यात घेऊन सर्व लवाजमा संगमेश्‍वरकडे रवाना झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT