Violent Clash Erupts Between 2 Groups In Maharashtra Akola Section 144 Imposed NCP MLA makes serious allegations against BJP and police  esakal
महाराष्ट्र बातम्या

Akola: दंगल पोलिसांना घडवून आणायची होती? राष्ट्रवादीच्या आमदाराचे भाजपसह, पोलिसांवर गंभीर आरोप

रुपेश नामदास

अकोल्यात शनिवारी रात्री दोन गटांत तुफान हाणामारी, दगड फेक झाल्याची धक्कादायक घटना घडली. किरकोळ वादातून परिस्थिती इतकी बिघडली की दोन्ही गटांमध्ये राडा झाला. या घटनेत एक महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे.

दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती कोणी घडवून आणली यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत पोलिस प्रशासन आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. (Violent Clash Erupts Between 2 Groups In Maharashtra Akola Section 144 Imposed NCP MLA makes serious allegations against BJP and police)

त्यांनी ट्विट मध्ये लिहिलं आहे की, "घटनास्थळी अकोला पोलीस एका तासानंतर पोहोचली. पोलिसांनाच ही दंगल घडवुन आणायची होती का? कर्नाटक निकालानंतर संभाजीनगर प्रमाणे भाजपाने अकोल्यात घडवली आहे का याची नि:पक्ष चौकशी गृह विभागाने करावी व आमच्या जिल्ह्यात शांतता कायम ठेवावी"

त्यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजप वाद वाढण्याची चिन्ह आहेत. संभाजीनगरमध्ये देखील मागील महिन्यात मोठी दंगल उसळली होती. त्या ठिकाणी देखील मोठा राडा पाहिला मिळाला.

दरम्यान अकोल्यातील हिंसाचाराचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन गटातील लोक एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहेत. यासोबतच ते वाहनांची तोडफोड करून गोंधळ घालत आहेत.

जुने शहरातील हरिहरपेठ परिसरात दोन गटांत शनिवारी रात्री ११:१५ वाजताच्या सुमारास वाद झाल्याने त्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. त्यानंतर काही लोकांचा जमाव तेथील घरांवर चालून गेला.

यावेळी एक गटाने तुफान दगडफेक करीत मोटारसायकलींचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड केली, तर काही समाजकंटकांनी एक घर पेटवून दिले. या घटनेत एक महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. (Latest Maharashtra News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या वनडे अन् टी२० संघाची घोषणा! विलियम्सन दुखपतीमुळे नाही, तर 'या' कारणामुळे खेळणार नाही

Call of Duty creator accident Video : ‘कॉल ऑफ ड्यूटी’ प्रसिद्ध व्हिडिओ गेम निर्माते विन्स झॅम्पेला यांचे भयानक अपघातात निधन!

INDW vs SLW, 2nd T20I: ११ चौकार, १ षटकार अन् नाबाद अर्धशतक... शफाली वर्माची बॅट तळपली! भारताचा सलग दुसरा विजय

Pune Traffic Diversion : नाताळ सणानिमित्त लष्कर परिसरात वाहतूक बदल; एम. जी. रोडवर निर्बंध!

Pakistan Airline Sold: कंगाल पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सची झाली विक्री!

SCROLL FOR NEXT