weather update India Meteorological Department heavy rains in Central Maharashtra Konkan sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update Maharashtra: मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीचा इशारा

विदर्भात मुसळधार पावसाची नोंद

सकाळ वृत्तसेवा

Weather Update Maharashtra : जून महिन्यात हुलकावणी दिलेल्या पावसाने जुलैमध्ये दमदार ‘कम बॅक’ केला आहे. राज्यात कोकण, घाटमाथा, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. राज्यात मॉन्सून सक्रिय झाल्याने पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार ते अति-मुसळधार पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी (ता. ८) मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात अतिवृष्टी तर, घाट परिसरात ‘रेड अलर्ट’चा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. राज्यात गुरुवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक भागात जोरदार सरींनी हजेरी लावली. विदर्भात ही मुसळधार पावसाची नोंद झाली. सध्या दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टी लगत समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे असून, तो बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. त्यात दक्षिण पाकिस्तान व लगतच्या परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वारे राज्यात प्रवेश करत असल्याने कोकण व घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. या हवामान परिस्थितीमुळे पुढील चार दिवस कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. मध्य महाराष्ट्रात ही दोन दिवस अतिवृष्टीसह जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पावसाच्या जोरदार सरी अपेक्षित आहेत.

मुंबईसह संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर शुक्रवारी (ता. ८) अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. घाट परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे सध्या घाट माथ्यावर पर्यटनाला बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.

शुक्रवारी (ता. ८) पावसाचा इशारा

पावसाचा ‘रेड अलर्ट’ असलेले जिल्हे

पुणे, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा

पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ असलेले जिल्हे

नाशिक, चंद्रपूर

यलो अलर्ट असलेले जिल्हे

धुळे, परभणी, नागपूर, जळगाव, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नांदेड, बुलडाणा, वाशीम, अकोला, गोंदिया, अमरावती, भंडारा, गडचिरोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon: माॅन्सूनची अजून पाच दिवसांची प्रतीक्षा! राज्यात ७२ टक्के कमी पावसाची नोंद, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस

आजचे राशिभविष्य - 16 जून 2026

Moong Dal Palak Idli Recipe: प्रोटीन आणि आयर्नचा भरपूर खजिना; नाश्त्यासाठी बनवा मऊ अन् स्पंजी 'मूग डाळ-पालक इडली'

16 जून 2026 पंचांग! चंद्रदर्शन, त्रिपुष्कर योग आणि शुभ मुहूर्तांची माहिती

अस्थिबोध : गरम पाण्याची पिशवी की बर्फ?

SCROLL FOR NEXT