महाराष्ट्र बातम्या

ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेणार

सकाळ डिजिटल टीम

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आजपासून तीन दिवस मुंबई दौऱ्यावर असणार आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आजपासून तीन दिवस मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. यात दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट ममता बॅनर्जी घेणार आहेत. १ डिसेंबरला ममता बॅनर्जी मुंबईतील उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात होणाऱ्या बंगाल ग्लोबल बिझनेस समिटसाठी आमंत्रणसुद्धा देणार आहेत.

राज्यात गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने ममता बॅनर्जींचा दौरा असणार आहे. दरम्यान, विविध मागण्यांसाठी ममता बॅनर्जी यांनी नुकतीच गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक घेतली होती. तृणमूल आणि काँग्रेस यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर ममतांच्या या दौऱ्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

ममता बॅनर्जी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा करणार असल्या तरी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेणार का हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. याआधी ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांच्या उपस्थितीत किर्ती आझाद यांच्यासह अनेक नेत्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मुंबईतही असं काही होणार का अशीही चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Clouds Arabian Sea : मॉन्सूनची चाहूल! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर मोठे ढग तयार; मुंबईसह उपनगरांत पावसाला सुरूवात

मंदार चांदवडकर नाही तर तारक मेहतामधील भिडे गुरुजीच्या भूमिकेसाठी 'या' मराठी अभिनेत्याला मिळाली ऑफर !

आनंदवार्ता! वाघ संवर्धनाला नवी चालना; ताडोबातील 'झिनत' ने ओडिशात दिला चार शावकांना जन्म

Stock Market Today: अमेरिका-इराण तणावामुळे शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला, कोणते शेअर्स वाढले?

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलात भावात 7% वाढ झाल्यानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू! पाहा तुमच्या जिल्ह्यातील ताजे दर

SCROLL FOR NEXT