Ambedkar-Pawar Meeting Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ambedkar-Pawar Meeting: प्रकाश आंबेडकरांसोबतच्या भेटीत काय झालं? शरद पवार म्हणाले....

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली त्याबाबत शरद पवारांनी सांगितलं

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे समन्वय प्रकाश आंबेडकर यांची काल(शनिवारी) भेट झाली. वाय. बी. चव्हाण सेंटर इथं खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने या दोघांची भेट झाली. आंबेडकरांच्या इंडिया आघाडीत सामिल होण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यानं पुन्हा राजकीय घडामोडींना वेग येऊ शकतो अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. मात्र, ही भेट राजकीय चर्चेसाठी नव्हती, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. तर या भेटीमागचं कारण देखील शरद पवारांनी सांगितलं आहे.

आज शरद पवारांची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी पत्रकारांनी त्यांना या भेटीबाबत प्रश्न केला. यावेळी शरद पवार म्हणाले की, इंडिया आघाडी मध्ये जे लोक सहभागी होतील त्याचा आनंद आम्हाला आहे. पण, कालची बैठक त्यासाठी नव्हती. कालची बैठक ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लम् ऑफ द रूपी नावाचा एक ग्रंथ लिहला होता. त्याला शंभर वर्षे पुर्ण झाली म्हणुन काल वाय.बी. चव्हाण सेंटरला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्या कार्यक्रमात माझं भाषण होतं, प्रकाश आंबेडकर याच्यासह इतर नेत्याचं भाषण होतं. त्यामुळे आम्ही एकत्र आलो होतो. तिथं राजकारण नव्हतं असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

शरद पवारांसोबतच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलले. म्हणाले, "वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये सुप्रिया सुळे यांनी कॉफी पिण्यासाठी आग्रह केला त्यामुळं तिथं शरद पवार यांच्यासोबत आम्ही कॉफी घेतली. पण यावेळी आम्ही बाराजण तिथं उपस्थित होतो. त्यामुळं आमची कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT