Sushma Andhare Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare: ललित पाटीलला आजार कुठला होता? डीनचे कॉल रेकॉर्ड चेक करा सुषमा अंधारेंचा पुन्हा हल्लाबोल

ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काल शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर भुसेंनी अंधारे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलताना दादा भुसे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा दादा भुसे यांची चौकशी करा म्हणत दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड तपासा त्याचबरोबर ससूनचे माजी डीन काळे यांचे देखील सर्व कॉल रेकॉर्ड तपासा अशी मागणी केली आहे. तसेच माझ्याकडचे पुरावे लवकरच समोर आणणार असल्याचंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काल देखील सुषमा आंधारे यांनी दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा असं म्हटलं होतं.या आरोपांवर उत्तर देताना दादा भुसे यांनी आरोपांचे खंडन करत खुशाल चौकशी करा, पण जर काही सापडले नाही तर माफी मागा असे प्रतिआव्हान दिले होते. तसेच चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचंही दादा भुसे यांनी म्हटलं होतं. त्यावर आज पुन्हा सुषमा अंधारे यांनी माध्यमांसमोर येत दादा भुसे यांच्या कॉलची चौकशी करा असं म्हंटलं आहे.

दादा भुसे यांची चौकशी करा. त्याचबरोबर पुण्याच्या ससूनचे माजी डीन काळे यांची ससूनचे लॅन्डलाईन यांचे देखील कॉल रेकॉर्ड चेक करा. ललित पाटील कोण हे मला माहित नाही असे भूसे सांगतात, पण ललित पाटील यांना मातोश्रीवर दादा भूसे घेऊन आले होते, हे खोटे आहे का? असा प्रश्न देखील अंधारे यांनी यावेशी उपस्थित केला आहे. तसेच आधीचे आणि आताचे अधिष्ठता आणि उपचार करणाऱ्या डॉक्टराची देखील चौकशी करा असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT