Narendra Dabholkar 
महाराष्ट्र बातम्या

दाभोलकरांच्या हत्येमागील सूत्रधार कधी पकडणार? अंनिसचा शासनाला सवाल

सनिल गाडेकर

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या हत्येमागील सूत्रधारांचं काय झालं? त्यांना कधी पकडणार? असा सवाल अंनिसतर्फे राज्य शासनाला करण्यात आला आहे. डॉ. दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने डॉ. वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. मात्र अमोल काळे या संशयित आरोपीविरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींच्या विरुद्ध देखील अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या खुनाचा तपास डॉ. तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. मात्र खुनामागील सूत्रधार कोण आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी शुक्रवारी (ता. १३) पत्रकार परिषदेत दिली. अंनिसचे पदाधिकारी श्रीपाल लालवानी, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, अरुण बुरुंडे यावेळी उपस्थित होते. १९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजता महर्षी शिंदे पुलावर कॅंडल मार्च तर २० ऑगस्ट रोजी मानवी साखळी आयोजित करण्यात आली आहे.

पी. साईनाथ यांचे व्याख्यान :

२० ऑगस्ट हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून देशात ठिकठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर करणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. तर पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिव्याख्यानमाला आयोजित केली आहे. त्याअंतर्गत यावर्षी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ या स्मृतिव्याख्यानासाठी वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘भारतीय लोकतंत्र और विवेकवादी शक्तियों के सन्मुख चुनौतियां’ या विषयवार ते विचार मांडणार आहेत. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र’ या ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. कोरोना संकटामुळे ही व्याख्यानमाला आॅनलाईन होणार आहे. तर १४ ते २० ऑगस्ट २०२१ दरम्यान संध्याकाळी ६ वाजता विविध व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी अंनिसच्या www.antisuperstition.org या संकेतस्थळावर भेट द्या.

व्याख्यानांमध्ये सहभागी होण्यासाठी झूम लिंक :

https://us02web.zoom.us/j/82993944572?pwd=WGlmYzZHNUlTUTRickRaR3ZSSkptUT09

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT