Late Former CJI Ahmadi Sakal
महाराष्ट्र बातम्या

ज्यांच्या शोकसभेमुळे सत्तासंघर्षाच्या सुनावणीला उशीर होतोय ते माजी CJI अहमदी कोण? | Shivsena Case

दत्ता लवांडे

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टामध्ये काही क्षणात सुरवात होणार आहे. CJI DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठ हा निकाल देणार आहे. हा निकाल वाचण्यापूर्वी माजी चीफ जस्टीस अहमदी यांच्या निधनामुळे शोक सभा आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेनंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल देण्यात येणार आहे. पण हे माजी चीफ जस्टीस अहमदी कोण? त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.

अजीज मुशब्बर अहमदी हे भारताचे २६ वे मुख्य न्यायाधीश होते. गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून कामकाज पाहिल्यानंतर त्यांची १९८८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची पदोन्नती करून १९९४ रोजी त्यांची देशाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आली होती. १९९४ ते १९९७ दरम्यान त्यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून काम केले. तर २ मार्च २०२३ रोजी त्यांचे निधन झाले.

दरम्यान, सुरतेतील दाऊदी बोहरा कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. ते आधी मुंबई प्रांताचे रहिवाशी होते, त्यांच्या वकिलीलाही मुंबईमधूनच सुरूवात झाली. कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर अहमदी यांनी मुंबईमधूनच १९५४ मध्ये आपल्या वकिली कारकिर्दीला सुरूवात केली होती. पण गुजरात राज्याच्या स्थापनेनंतर ते गुजरातमध्ये राहायला गेले.

त्यांना १९६४ मध्ये अहमदाबाद जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर १९७६ मध्ये त्यांची गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियक्ती करण्यात आली. गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी अनेक कामं केली होती.

१९९७ मध्ये त्यांनी सेवानिवृत्त झाल्यामुळे आपले पद सोडले होते. त्यानंतर ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरू बनले. त्यानंतर २००७ साली पुन्हा त्यांना अलीगढ विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर त्यांना जागतिक विद्यापीठांमध्ये बोलण्यासाठी अनेकदा आमंत्रित करण्यात आले होते.

आज सुप्रीम कोर्टात माजी मुख्य न्यायाधीश अहमदी यांच्या निधनाच्या शोकसभेमुळे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणीला जवळपास एक तास उशीर होत आहे. ही शोकसभा तब्बल ४० ते ४५ मिनीटे चालणार असून त्यानंतर सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुरूवात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT