Rohit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar: बारामतीमध्ये अजितदादांच्या विरोधात कोण उभं राहणार? रोहित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार सामना होणार? पवार कुटुंबातील व्यक्तीने दिलं उत्तर

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी समर्थक आमदार यांनी बंड केलं आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार गट शिवसेना आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. दोन्ही गट आपणच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या फुटीच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणते नेते कोणत्या विधानसभा, लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार? हा एक महत्वाचा मुद्दा समोर येईल.(Latest Marathi News)

तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील या फुटीनंतर बारामतीमध्ये काय होणार? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहेत. सुप्रिया सुळे यांना पवार कुटुंबातूनच आव्हान मिळणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर बारामतीतून यावेळी कोण उभं राहणार हाही प्रश्न निर्माण झाला आहे.(Latest Marathi News)

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यामुळे बारामतीत काय होणार? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आज रोहित पवारांना पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार असा सामना होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी 'बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार निवडणूक होणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.(Latest Marathi News)

तर पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, 'अजितदादा तशी भूमिका घेणार नाहीत. बारामती विधानसभेवर फक्त अजितदादाच निवडून येऊ शकतात. दुसरं कुणी नाही, अजितदादा कुटूंबाच्या बाबतीत तशी भूमिका घेणार नाहीत'. तर अजित पवार यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार नाही, माझ्या कुटूंबातील कुणीही निवडणुकीला उभं राहणार नाही, अजितदादांनी केलेल्या कामावर दादाच निवडून येणार, लोकसभेला पण कुणी कितीही प्रचार केला तरी सुप्रिया सुळे निवडून येणार' असंही पुढे रोहित पवार म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT