Pankaja Munde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना राज्यसभेची उमेदवारी मिळणार? फडणवीसांनी घेतली गुप्त भेट

Pankaja Munde: राज्यसभा निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहे. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशातच काही दिवसांवर असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यसभेच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पंकजा मुंडे यांचेही नाव चर्चेत असल्याची माहिती आहे. काल रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पंकजा मुंडे यांची गुप्त भेट झाली. राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणुका होणार आहे. या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे या केंद्रात पक्ष संघटनेचे काम पाहत आहेत. त्यामुळे त्यांची देखील राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती आहे. काल(मंगळवारी) ही भेट झालेली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून नावांची चाचपणी सुरू आहे. यादरम्यान या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्रात पावसाची प्रतिक्षा कायम! पुढचे काही दिवस पाऊस नाही? हवामान विभागाचा अंदाज काय?

Karnataka Accident: राज्यात दोन अपघातांत सात जण ठार; कोलार, चिक्कबळ्ळापुरात दुर्घटना, तिरुपतीहून परतताना काळाचा घाला

IND vs AFG : अफगाणिस्तानच्या 'त्या' कृतीने पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या! भारताचा नकाशा अन् जगासमोर आणले सत्य… नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटलांवर मध्यरात्री उपचार, सलाइन लावले

Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

SCROLL FOR NEXT