Cold Weather In north maharashtra esakal
महाराष्ट्र बातम्या

Winter Cold : उत्तर महाराष्ट्रात वाढतोय गारठा!

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढू लागल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवू लागला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढू लागल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा जाणवू लागला आहे. राज्यातील कोरडे हवामान आणि किमान तापमानासह कमाल तापमानातही सातत्याने होणारी घट यामुळे राज्यात हळूहळू थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात जळगाव येथे ११ अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद गुरुवारी झाली.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही चक्रीवादळ निवळली आहेत. दरम्यान, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढू लागला आहे. त्यामुळे हे थंड वारे राज्यातून वाहू लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नागरिकांना हवीहवीशी वाटणारी थंडी लवकरच जाणवण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर; मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, बीड आणि विदर्भात अकोला, अमरावती, बुलडाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे किमान तापमानात घट झाली आहे.

पुणे आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवसांत आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. पुण्यात १७.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान गुरुवारी नोंदविले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aamir Khan Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खानची पहिली प्रतिक्रिया; '3 इडियट्स'मधील रँचोबाबत केला मोठा खुलासा

Petrol-Diesel Price: १७ जुलैला इंधनाचे ताजे दर जाहीर! कच्चे तेल १२ टक्क्याने महागल्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल कितीला?

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

Pune Crime : कोथरूड हल्ला प्रकरणातील घायवळ टोळीच्या गुंडाला मुंबईतून अटक, व्यावसायिकावर कोयत्याने केले होते वार

Tukaram Mundhe : फरक पडतो... फक्त 'तुकाराम' लागतात! FDA आयुक्त मुंढेंचा राज्यभरात धडाका; गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाचे धाबे दणाणले, आता पुढचा नंबर कोणाचा?

SCROLL FOR NEXT