Pandharpur sakal
महाराष्ट्र बातम्या

Winter Session 2023 : विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा; हिवाळी अधिवेशनात अहवाल सादर

पंढरपूरच्या विठ्ठलाचा लाडूचा प्रसाद वारकरी मोठ्या मनोभावे घरी घेऊन जातात, परंतु हा लाडू आरोग्याला अपाय करु शकतो, असा अहवाल आहे.

संतोष कानडे

मुंबईः पंढरपूरच्या विठ्ठलाचा लाडूचा प्रसाद वारकरी मोठ्या मनोभावे घरी घेऊन जातात, परंतु हा लाडू आरोग्याला अपाय करु शकतो, असा अहवाल आहे. तो अहवाल विधीमंडळ अधिवेशनामध्ये सादर झालेला आहे. २०२०-२०२१ वर्षातील हा प्रकार असला तरी दोषींवर कारवाई झालेली नाही.

२०२०-२१मध्ये ज्या संस्थेला प्रसादाचा लाडू बनवण्याचं कंत्राट दिलं होतं. त्या संस्थेला लाडू बनवण्यासंदर्भात निकष लावण्यात आले होते. लाडूमध्ये कुठले ड्रायफ्रूट किती प्रमणात हवेत, कुठल्या तेलामध्ये लाडू बनवले गेले पाहिजेत याची नियमावली होती. परंतु प्रत्यक्ष तपासणी अहवालामध्ये तफावत आढळून आली.

तेव्हाच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये जिथे लाडू बनवले जात होते, तिथे अस्वच्छता, खराब दर्जाचं तेल आणि लाडूंमध्ये ड्रायफ्रूटचा पत्ता नव्हता. त्यामुळे लेखापरीक्षण अहवालाच्या आधारावर ते टेंडर रद्द करण्यात आलेलं होतं. परंतु संबंधित संस्थेवर कारवाई करण्यासाठी विधीमंडळ अधिवेशनात अहवाल सादर करण्यात आलेला आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway Toll : कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ! महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण, पण 'या' ठिकाणी टोलनाका उभारणी अंतिम टप्प्यात!

CSK vs SRH Live: महेंद्रसिंग धोनी 'चेपॉक' वर आला, पण खेळणार का? कॅप्टन ऋतुराजने उत्तर दिले... रवी शास्त्रींनी MS म्हणताच जल्लोष अन्...

Pune Garbage Scam: कचरा माफियांचा पुण्यात डेरा? ७०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; नगरसेवकांकडून मुख्यसभेत प्रशासनाला घेराव

Latest Marathi News Live Update : शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Devsthan Inam Abolition: देवस्थान इनाम निर्मूलन कायदा मागे घ्या; अष्टविनायक मंदिरांचा एकमुखी इशारा, जमिनींच्या सुरक्षेसाठी संयुक्त लढ्याची घोषणा

SCROLL FOR NEXT