schools sakal
महाराष्ट्र बातम्या

Solapur News: झेडपी शिक्षकांची पंचाईत! निधी नसल्याने १ तारखेला नव्हे महिन्यातून दोनदा पगारी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या २७९५ शाळांवर नऊ हजार शिक्षक असून त्यांच्या वेतनासाठी दरमहा ७४ कोटी रुपये लागतात. परंतु, आता ४५ ते ४७ कोटीच निधी येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांवरील शिक्षकांचे वेतन एक तारखेला नव्हे तर १० ते २५ तारखेपर्यंत होऊ लागले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शासनाच्या तिजोरीत शिक्षकांच्या पगारासाठी पुरेसे पैसे नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या २७९५ शाळांवर नऊ हजार शिक्षक असून त्यांच्या वेतनासाठी दरमहा ७४ कोटी रुपये लागतात. परंतु, आता दरमहा ४५ ते ४७ कोटींचाच निधी येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांवरील शिक्षकांचे वेतन एक तारखेला नव्हे तर १० ते २५ तारखेपर्यंत होऊ लागले आहे.

मार्च २०२० रोजी राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पुढील दोन वर्षे शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारला वेळप्रसंगी कर्ज काढावे लागले. आता कोरोनाची स्थिती सावरली असून साडेतीन ते चार लाख कोटींच्या महसुली उत्पन्नाचे राज्याचे उद्दिष्ट आहे. राज्याच्या तिजोरीत दरमहा सरासरी २० हजार कोटींचा महसूल जमा होत आहे.

पण, राज्य सरकारच्या तिजोरीतील एक लाख ६० हजार कोटी रुपये शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होतो. त्यात सर्वाधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च आहे. आता माध्यमिक शाळा, खासगी प्राथमिक शाळा, उच्च महाविद्यालयांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन दरमहा वेळेवर दिले जात आहे. परंतू, जिल्हा परिषदेच्या शाळांवरील शिक्षकांना वेतन वेळेत मिळत नाही. आता काहींनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे.

वेतनासाठी निधी कमी येत असल्याने जिल्ह्यातील ११ तालुक्यातील सात तालुक्यातील शिक्षकांचे पहिल्या टप्प्यात तर पुढील टप्प्यात उर्वरित तालुक्यातील शिक्षकांचे वेतन केले जात आहे. पहिल्या टप्प्यातील वेतन १० तारखेपर्यंत तर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांचे वेतन २५ तारेखपर्यंत करावे लागत आहे.

‘१ तारखेला वेतन’ची अंमलबजावणी नाहीच

माध्यमिक, प्राथमिक शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला व्हावे, असा शासन निर्णय आहे. शिक्षकांनी काढलेले होम लोन, पर्सनल लोन, वाहनावरील कर्जाचे दरमहा १ ते ५ तारखेपर्यंत हप्ते असतात. बॅंकांमधील त्यांचे ‘सिबिल’ खराब होऊ नये म्हणून त्यांना १ तारखेला वेतन मिळावे, अशी अपेक्षा असते. तरीपण, वर्षातून तीन-चार महिने वगळता अन्य महिन्यांमध्ये त्यांचे वेतन ५ तारखेच्या पुढेच होते ही वस्तुस्थिती आहे. जिल्ह्यातील १५ हजार माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दरमहा ८५ कोटी रुपये वेळेत येतात. त्यांचे वेतन वेळेतच होते, अशी माहिती वेतन अधीक्षक प्रकाश मिश्रा यांनी दिली.

निधीच्या उपलब्धतेनुसार वेतनाचे नियोजन

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी दरमहा सुमारे ७४ कोटी रुपये लागतात. पण, काही महिने निधी थोडा कमी पडत असल्याने त्यानुसार नियोजन करून वेतन दिले जात आहे.

- संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

झेडपी शाळा, शिक्षकांची स्थिती

  • एकूण शाळा

  • २,७९५

  • शिक्षकांची संख्या

  • ९,१६०

  • वेतनासाठी दरमहा रक्कम

  • ७४ कोटी

  • शासनाकडून मिळणारी रक्कम

  • ४५ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT