milind gawali
milind gawali instagram
मनोरंजन

'उर्मट माजोर्डा स्वार्थी..'; मिलिंद गवळी स्वत:विषयीच का म्हणत आहेत असं?

स्वाती वेमूल

'आई कुठे काय करते' Aai Kuthe Kay Karte या लोकप्रिय मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी Milind Gawali यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. मालिकेतील त्यांचं दमदार अभिनय नेहमीच चर्चेत असतं. पण त्याचसोबत सोशल मीडियावर त्यांनी लिहिलेल्या पोस्ट तितक्याच लक्षवेधी असतात. या पोस्टमध्ये ते त्यांच्या अनिरुद्ध या पात्राविषयी आणि मालिकेतील नव्याने एण्ट्री केलेल्या आशुतोष या पात्राविषयी आपली मतं मांडली आहेत.

मिलिंद गवळी यांची पोस्ट-

'"Success is always not a fluke", किती महत्त्वाचं वाक्य आशुतोष केळकर म्हणतोय. "आशुतोष पुढे अनिरुद्ध निरुत्तर".. खरंच अनिरुद्धसारख्या माणसांकडे आशुतोष केळकर यांसारख्याच्या प्रश्नांची कधीच उत्तरं असतात? आशुतोष केळकर सारखी जी माणसं असतात, साधे सरळ प्रामाणिक असतात त्यांना आनंदी आयुष्य जगणं किती सोपं जातं. आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यशस्वी होत जातात आणि त्या यशाचा त्यांना गर्व नसतो. आशुतोष केळकर असाच गोड माणूस आणि अशी माणसं आपल्याला हवीहवीशी वाटतात. आपल्याला म्हणजे फक्त अनिरुद्धसारख्यांना नाही आवडत कारण त्यांच्यापेक्षा ते सुपिरियर असतात, सगळ्याच बाबतीत. तेच अनिरुद्धला सहन होत नाही. खरंच किती कमी दिवसात आशुतोष केळकर लोकांचं आवडतं कॅरेक्टर झालं, खरंतर मलाही ते कॅरेक्टर खूपच आवडतं आणि कॅरेक्टर रंगवणारा ओमकार गोवर्धन हा पण खूप आवडतो. तो तसाच आहे , आशुतोष केळकरसारखा. कधी कधी कलाकार आणि ते कॅरेक्टर अगदी एकरूप होतो, तसा आशुतोष केळकर या कॅरेक्टरमध्ये ओमकार फिट बसला. जसा अविनाशच्या कॅरेक्टरमध्ये आमचा शंतनु मोघे फिट बसला. सिरीयलच्या कास्टिंग डिपार्टमेंट म्हणजेच नमिता वर्तक, रवी कर्मारकर यांचं खरं कौतुकच आहे, एवढ्या सगळ्या कलाकारांमध्ये बरोबर त्या कॅरेक्टरला सूट होणारा कलाकार शोधायचा. किती कठीण काम आहे. आमचा शंतनु मोघे अतिशय गोड प्रेमळ स्वभावाचा म्हणजे अविनाशसारखा अगदी तसाच, ओमकार गोवर्धन असाच सज्जन छान हुशार अगदी आशुतोष केळकर सारखा. माझ्या कधी कधी मनात विचार येतो की माझं कास्टिंग करताना अनिरुद्ध देशमुखसारख्या व्यक्तिरेखेचा कास्टिंग करतात मिलिंद गवळी सुचला. म्हणजे माझ्यामध्ये अनिरुद्ध देशमुख त्यांना दिसला. नक्कीच दिसला असणार..उर्मट माजोर्डा स्वार्थी. बापरे हे सगळे गुण माझ्यात आहेत? त्यांना दिसले? मिलिंद गवळी आत्मपरिक्षण करणं गरजेचे आहे,' असं लिहित त्यांनी हसण्याचे इमोजी पोस्ट केले.

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. यामध्ये मधुराणी गोखले प्रभुलकर, मिलिंद गवळी, रुपाली भोसले हे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. मालिकेतल्या घडामोडींबाबत ते स्वत:चे विचार मांडत असतात. त्यांचे हे पोस्ट चाहत्यांना फार आवडतात. मिलिंद यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT